• Sat. Jun 6th, 2026

    CA, बिल्डरांची भोंदूबाबा अशोक खरातला साथ; Ravindra Dhangekar यांनी घेतली मोठी नावं, मालमत्तेच्या चौकशीची मागणी

    CA, बिल्डरांची भोंदूबाबा अशोक खरातला साथ; Ravindra Dhangekar यांनी घेतली मोठी नावं, मालमत्तेच्या चौकशीची मागणी

    भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांनी खळबळजनक खुलासे केले आहेत. CA ललित पोफळे आणि दोन मोठ्या बिल्डरांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा दावा करत, धंगेकरांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी केली आहे.

    आमदार रवींद्र धंगेकर यांचे ललित पोफळेवर गंभीर आरोप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण अधिकच गडद होत असून आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात मोठे खुलासे केले आहेत. या प्रकरणामध्ये पुण्यातील दोन बिल्डर असल्याचा खळबळजनक दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यातील एक म्हणजे CA ललित पोफळे यांच्यावर गंभीर आरोप करत, या संपूर्ण रॅकेटमध्ये त्यांचा मोठा सहभाग असल्याचा दावा केला आहे. यासोबतच काही नामांकित व्यक्ती आणि एका बिल्डरचाही संबंध असल्याचे संकेत देत लवकरच आणखी नावे उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    “एवढी संपत्ती कशी?”

    धंगेकर म्हणाले की, ललित पोफळे हा या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असून गेल्या काही वर्षांत त्याने संशयास्पद पद्धतीने मोठी संपत्ती जमा केली आहे. “दहा वर्षांपूर्वी साधी परिस्थिती असलेला हा माणूस आज कोट्यवधींचा मालक कसा झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काळ्या पैशांचे पांढरीकरण करण्यामध्ये पोफळे पारंगत असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

    “पोफळे खरातसोबत सक्रिय”

    तसेच, “पोफळे हा अशोक खरातसोबत सक्रिय होता आणि अनेक लोकांना, विशेषतः काही महिलांना, त्याच्याकडे नेण्याचे काम करत होता”, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. अनेक महिलांनी त्रास झाल्याच्या तक्रारी केल्याचा दावा करत या प्रकरणाचा विस्तार मोठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesCrime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची विक्री; पोलिसांची धडक कारवाई, तिघांना अटक, सर्व साहित्य जप्त

    याचबरोबर, धंगेकर यांनी पोफळे यांचे काही धार्मिक आणि सामाजिक संस्थांशीही संबंध असल्याचा दावा केला. “त्याने रामदेव बाबा यांच्या संस्थेसोबतही काम केले असून आर्थिक व्यवहारांमध्ये त्याचा सहभाग होता,” असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या सर्व व्यवहारांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. धंगेकर यांनी पुढे सांगितले की, “या प्रकरणात पुण्यातील आणखी एका मोठ्या बिल्डरचा सहभाग असून त्याचे नाव लवकरच जाहीर करणार आहेत. हे प्रकरण फक्त एका भोंदू बाबापुरते मर्यादित नाही, तर यामागे मोठे जाळे आहे,” असेही त्यांनी सांगितले.

    “सर्व व्यवहारांची चौकशी व्हावी”

    दरम्यान, ललित पोफळे सध्या फरार असल्याचा दावा करत त्यांनी पोलिसांवरही टीका केली. “त्याचा तात्काळ शोध घेऊन मागील दहा वर्षांतील सर्व व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे. योग्य तपास झाला नाही तर मी पुरावे समोर आणणार,” असा इशाराही त्यांनी दिला.

    Maharashtra TimesMaharashtra Politics: भाजप स्वबळाच्या तयारीत, शिंदेसेनेनंही कंबर कसली; श्रीकांत शिंदेंकडे मोठी जबाबदारी, जम्बो टीम जाहीर

    फाशीची मागणी

    “ललित पोकळे यांनी अनेक पुण्यातील देखील महिलांना अशोक खरातकडे पाठवण्यात त्याचा हात असल्याचा आरोप करत त्यांनी ललित पोपळे आणि अशोक खरात यांना चौकात आणून फाशीची शिक्षा दिली पाहिजे”, अशी मागणी केली आहे. ललित पोकळेला शिक्षा व्हावी याकरिता मी महासंचालकांना पत्र देणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा