Nagpur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नागपुरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
नागपूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपुरात सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एका १३ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचं अपहरण करत, तिच्यावर दोन दिवसांत दोनदा बलात्कार केल्याची संतापजनक घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी २८ वर्षीय नराधम आरोपीला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शहरातील सिव्हिल लाईन्स भागातील एका नामांकित शाळेत इयत्ता आठवीत शिकते. आरोपी करण केशव केशी (वय २८, रा. जगदीश नगर, काटोल रोड) हा टाईल्स फिटिंगचे काम करतो. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली आणि तिला आपल्या जाळ्यात ओढले. १८ मार्च आणि २७ मार्च अशा दोन दिवशी आरोपीने पीडितेला शाळेच्या गेटवरून फूस लावून पळवून नेलं. Ashok Kharat : प्रेग्नंट होऊ नये, म्हणून खरात महिलांना गर्भनिरोधक गोळ्या देत असल्याचा संशय, नाशिकमधील नामांकित डॉक्टर रडारवर आरोपीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पीडितेची ओळख पटू नये म्हणून आरोपीने तिला प्रथम सदर भागातील एका सार्वजनिक शौचालयात नेलं. तिथे तिचे शाळेचे गणवेश बदलून तिला साधे कपडे घालण्यास भाग पाडले. त्यानंतर तो तिला फ्रेंड्स कॉलनीतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. हॉटेलमध्ये संशय येऊ नये म्हणून आरोपीने एका दुसऱ्या मुलीचे आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सादर केले आणि खोली भाड्याने घेतली. याच खोलीत त्याने पीडितेवर अत्याचार केला. जेव्हा पीडितेने या कृत्याला विरोध केला, तेव्हा आरोपीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Reels Star Surendra Patil : घरातील शू-रॅकमध्ये गुप्त कप्पा, पोलिसांच्या छाप्यात अवैध शस्त्रसाठा सापडला, प्रसिद्ध रील्स स्टार सुरेंद्र पाटीलला पुन्हा अटक
मुलगी गैरहजर असल्याचा पालकांना मेसेज
शाळेतून वारंवार गैरहजर असल्याने पीडितेच्या पालकाला शाळेतून मुलगी गैरहजर असल्याचा मेसेज मिळाला. मुलीच्या वागण्यातील बदल आणि शाळेतील दांडी यामुळे आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला घाबरलेल्या मुलीने नंतर आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग सांगितला. हे ऐकताच पालकांचा पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर आईने तातडीने सदर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. आईच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत आरोपी करण केशी याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा सोशल मीडियाचा वापर आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा