• Sun. Jun 7th, 2026
    प्रेग्नंट होऊ नये, म्हणून खरात महिलांना गर्भनिरोधक गोळ्या देत होता? नाशिकमधील नामांकित डॉक्टर रडारवर

    Nashik Women Assault Case : महिलांना जाळ्यात ओढल्यानंतर त्यांना गर्भधारणा होऊ नये यासाठी अशोक खरात काही विशिष्ट औषधे किंवा गर्भनिरोधक गोळ्या देत होता का, असा संशय आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : महिला लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरात याच्या तपासात दररोज नवनवीन धक्कादायक प्रकरण समोर येत आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या गुन्ह्यात नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

    काय आहे प्रकरण?

    सध्या पोलीस कस्टडीत असलेल्या अशोक खरात याची SIT कडून कसून चौकशी सुरू आहे. या तपास पथकाच्या चौकशीत खरात याच्या कार्यपद्धतीबाबत काही गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. महिलांना जाळ्यात ओढल्यानंतर त्यांना गर्भधारणा होऊ नये यासाठी अशोक खरात काही विशिष्ट औषधे किंवा गर्भनिरोधक गोळ्या देत होता का? आणि ही औषधे त्याला कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळत होती? या दिशेने देखील आता तपास सुरू आहे.

    संमोहित करण्यासाठी औषधं?

    इतकेच नव्हे तर महिलांना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्यांना संमोहित करण्यासाठी देखील काही विशिष्ट औषधांचा वापर केला जात होता का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या प्रतिबंधित औषधांचा पुरवठा नेमका कोठून झाला? आणि त्यामागे कोणत्या नामांकित क्लिनिक किंवा हॉस्पिटलचे धागेदोरे आहेत? यावर आता तपास यंत्रांनी लक्ष केंद्रित केले आहे.
    Maharashtra TimesShivdeep Lande : बहिणी पाठ फिरवतात, बायकोही साथ सोडते, पण मुलगी बापासाठी जीव धोक्यात घालते; शिवतारेंना लेकीचं किडनीदान, पती शिवदीप लांडेंना अश्रू अनावर

    नाशिकचे बडे डॉक्टर रडारवर

    येत्या काही दिवसांत SIT च्या तपासातून आणखी काही खळबळजनक आणि गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर या गुन्ह्यात डॉक्टरांचे संगनमत असल्याचे निष्पन्न झाले तर, नाशिकमधील वैद्यकीय क्षेत्रातील काही मोठी नावे या प्रकरणात अडकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता एकूणच तपास यंत्रणांच्या या दिशेने सुरू असलेल्या चौकशीत काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    Trupti Desai | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण तापणार, आणखी मोठी नावं फुटणार, देसाईंचा दावा

    Maharashtra TimesCrime News : पोलिसाने चिठ्ठीवर मोबाईल नंबर लिहून ट्रेनमध्ये तरुणीला दिला, व्हिडिओ शूट करताच काढता पाय, नेटिझन्स संतापले
    खरातने विशिष्ट मंत्र म्हणून पीडितेवर मानसिक नियंत्रण मिळविल्याचा आरोप असल्याने मंत्रतंत्र म्हणतानाची त्याची कृती आणि पीडितेची तत्कालीन स्थिती याचे निरीक्षण तपास पथकाने नोंदवले आहे. पीडितेची शुद्ध हरपण्यासाठी किंवा संमोहित करण्यासाठी तिला काही विशिष्ट पदार्थ खायला किंवा प्यायला दिले जात होते का, आदींचा तपास एसआयटीने केला आहे

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा