• Sat. Jun 6th, 2026
    Pune Crime: प्रेमसंबंध तुटल्याचा राग; 25 वर्षीय तरुणीला प्रियकराने निर्घृणपणे संपवलं, कात्रज बोगद्याजवळील घटना

    Pune Crime: अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका तरुणाने २५ वर्षीय तरुणीला दोरीने गळा आवळून निर्घृणपणे संपवलं. ही घटना नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली.

    पुणे क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    पुणे : अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून सतत होणाऱ्या वादाला कंटाळून एका तरुणीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना पुणे-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली. खून करून पसार झालेल्या आरोपी तरुणाला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

    मनीषा खम्म दमाई (वय २५, सध्या रा. नऱ्हे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, सध्या रा. हिंजवडी) याला अटक करण्यात आली. याबाबत किशन भरत परिहार (वय ३५, सध्या रा. नऱ्हे) याने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    Maharashtra TimesPune Crime : पुणे विमानतळावर 26.80 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, सीमाशुल्क विभागाची कारवाई; संत्र्याच्या खोक्यातून चालू होती तस्करी
    आरोपी प्रकाश याच्याशी मनीषाचे अनैतिक संबंध होते. किशन, मनीषा आणि प्रकाश हे मूळचे नेपाळचे आहेत. ते रखवालदार म्हणून काम करतात. मनीषा आणि प्रकाशचे विवाहबाह्य संबंध होते. प्रकाशने अनैतिक संबंध सुरू ठेवण्यास नकार दिला होता. तेव्हापासून त्यांच्यात वाद सुरू झाले. तिच्या त्रासामुळे प्रकाश चिडला होता.

    Maharashtra TimesPune Crime: व्यावसायिक स्पर्धेला भयानक वळण; स्ट्रीट फूड विक्रेत्यांकडून रेस्टॉरंट मालकासह दोघांना मारहाण, पुण्यातील घटना
    आरोपीने १८ मार्चला मनीषाला नऱ्हे परिसरात भेटण्यासाठी बोलावले. गोड बोलून त्याने तिला कात्रज बोगद्याजवळील एका हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दाट झाडीत नेले. तेथे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपीने दोरीने गळा आवळून तिचा खून केला आणि तेथून पसार झाला. दरम्यान, काही दिवसांनी दाट झाडीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबेगाव पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांनी तपास सुरू करून मृत तरुणीची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा