Nisarga Society Lift Crashes Youth Died : दिनेश सुरंगे हा लिफ्टने खाली जात असताना तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अडकली. दिनेश यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच अचानक लिफ्टची मुख्य केबल तुटली.
निसर्ग हौसिंग सोसायटी लिफ्ट अपघात तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पिंपरी-चिंचवड : शहारातील तळेगाव दाभाडे येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ‘निसर्ग हौसिंग सोसायटी’मध्ये लिफ्टची केबल तुटून झालेल्या भीषण दुर्घटनेत दिनेश सुरंगे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन पुंडलिक वारके यांच्यासह ११ सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
‘निसर्ग हौसिंग सोसायटी’ची लिफ्टअचानक सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या मध्ये अडकली. त्यावेळी दिनेश आतमध्येच होता. लिफ्ट बंद पडल्याचं लक्षात येताच सोसायटीतील लोकांनी लगेच धाव घेतली. ‘घाबरू नको, आम्ही तुला बाहेर काढतो’ असं सांगत त्याला धीर दिला जात होता. काहीजण लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न करत होते. पण अचानक सगळं उलटलं. बचावकार्य सुरू असतानाच लिफ्टची मुख्य केबल तुटली आणि जोराच्या आवाजासह लिफ्ट थेट खाली कोसळली आणि या अपघातात दिनेशचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की दिनेशला वाचवण्याची संधीच मिळाली नाही.
Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक-दीड तास चर्चा; राजकीय चर्चांना उधाण
या घटनेनंतर सोसायटीत एकच खळबळ उडाली. रहिवासी घाबरलेले आणि संतापलेलेही दिसत होते. ‘लिफ्ट आधीपासूनच नीट नव्हती, आवाज येत होते, पण कोणी गांभीर्याने घेतलं नाही,’ असं काही सोसायटीतल्या नागकिरांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली आहे. सोसायटीचे चेअरमन पुंडलिक वारके, दीपक हेंद्रे, विनायक खोराटे, नीलेश गवळी, प्रवीण श्रीवास आणि इतर अशा एकूण ११ पदाधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ashok Kharat: खरात अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पत्नीशी संबंध ठेवायला लावायचा; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, सरकारकडून उत्तर
हलगर्जीपणामुळे तरुणाचा बळी
प्राथमिक तपासात लिफ्टची नियमित देखभाल आणि तपासणी करण्यात मोठी हलगर्जीपणा झाल्याचं समोर आलं आहे. याच निष्काळजीपणामुळे हा जीवघेणा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पण निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा जीव गेला, आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला हीच या घटनेची खरी वेदना आहे. त्यामुळे लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा