Vijay Wadettiwar: या प्रकरणाशी संबंधित अनेक व्हिडिओ क्लिप्स समोर येत असून यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
खरात अधिकाऱ्यांना एकमेकांच्या पत्नीशी संबंध ठेवायला लावायचा; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, सरकारकडून उत्तर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापले असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. वडेट्टीवार यांनी दावा केला की, या प्रकरणात एक नवीन आणि धक्कादायक बाब समोर आली असून खरात हा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक दुसऱ्यांच्या फॅमिली सुद्धा शेअर करत होता. हे महाराष्ट्राचा इज्जत काढणारे किती खालचं आणि घाणेरडं प्रकरण आहे, तरी राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असावी,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, “या प्रकरणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत असून इतक्या गंभीर बाबींवरही राज्यकर्त्यांकडून अपेक्षित संवेदनशीलता दिसत नाही. हे प्रकरण किती घाणेरडे आहे, याची जाणीव असूनही सत्ताधारी गप्प आहेत, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकते,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीही या प्रकरणात अनेक आमदार, अधिकारी, तसेच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची नावे कोड स्वरूपात नोंदवली गेल्याचा आरोप केला होता. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि यात सामील असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.
सरकारकडून वडेट्टीवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर अशोक खरात प्रकरणावरून सरकारी अधिकाऱ्यांवर होणाऱ्या आरोपांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. “अशा प्रकारे अधिकाऱ्यांवर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर सार्वजनिकरित्या आरोप करणे योग्य नाही. कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलल्यास त्यांच्या विश्वासार्हतेवर आणि कुटुंबातील नातेसंबंधांवर परिणाम होतो,” असे बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, “जर वडेट्टीवार यांच्याकडे कोणतीही ठोस आणि गोपनीय माहिती असेल, तर ती त्यांनी सरकारकडे सादर करावी. सार्वजनिक मंचावर अशा प्रकारचे आरोप करून प्रशासनाच्या विश्वासार्हतेला धक्का देणे टाळावे,” असेही त्यांनी सांगितले. यंत्रणा आपले काम करत आहे. चौकशीसाठी ज्यांना बोलावणे आवश्यक आहे त्यांना बोलावले जाईल. या प्रकरणावर अनावश्यक चर्चा करून तपासात अडथळा आणू नये, त्यांच्याकडे माहिती असेल तर मुख्यमंत्र्यांकडे आणि महसूल विभागाची माझ्याकडे द्यावी, असेही बावनकुळे म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा