• Sat. Jun 6th, 2026

    Nashik Accident: दशक्रिया विधीवरुन घरी जाताना सेवानिवृत्त शिक्षकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

    Nashik Accident: दशक्रिया विधीवरुन घरी जाताना सेवानिवृत्त शिक्षकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

    Nashik- Pune Highway Accident: आठ दुचाकींना कारने जोरदार धडक देत नुकसान केले. अपघातामुळे नाशिक-पुणे मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

    नाशिकच्या तरुणीचा अपघातात मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: दोघा मित्रांसह दुपारी नवीन दुचाकी घेण्यासाठी गेलेल्या जेलरोडच्या तरुणीला नियंत्रण सुटलेल्या कारचालकाने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला. तिचे दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले. वेगात असलेल्या या कारने आठ दुचाकींना जोरदार धडक दिली. कारसह चालकाला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

    नेमकं काय घडलं?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल काशीनाथ खरोटे (वय ३०, रा. श्रीकृष्ण नगर, पंचक, जेलरोड) असे घटनेत मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील बाळ येशू मंदिराशेजारील खुशी होन्डा शो रूम येथे ती शनिवारी (दि.२८) दुपारी अडीचच्या सुमारास नवीन दुचाकी खरेदीसाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत कोरी सनी रामसजीवन आणि कोरी रवींद्र अरुण हे दोन मित्र होते. शो रूमबाहेर ते तिघे बोलत होते. त्यावेळी नाशिकरोडहून द्वारकेच्या दिशेने वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारमधील (एमएच १५ डीएस १३०४) चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. कारने शीतलसह सनी आणि रवींद्र यांना जोरदार धडक दिली. आणखी आठ दुचाकींनाही धडक दिली.

    Maharashtra TimesRupali Thombare: भोंदूबाबा खरातच्या ‘रॅकेट’मागे चाकणकर! राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे-पाटील यांचा गंभीर आरोप
    डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू
    नागरिकांनी स्विफ्ट कार मागे ढकलून शीतलला बाहेर काढले. तिला बिटको रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कोरी सनी व कोरी रवींद्र यांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत. रवींद्र सायंकाळपर्यंत शुद्धीवर आलेला नव्हता.

    Maharashtra Timesभाविकांसाठी आनंदाची बातमी! चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंग गडासाठी दर 15 मिनिटांनी बस, कुठून किती बसेस?
    खरोटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर
    शीतल खरोटे ही अविवाहित असून तिच्या पश्चात आजारी वडील तसेच आई आणि तीन बहिणी असा परिवार आहे. ती घरात सर्वात धाकटी असल्याने सर्वांची लाडकी होती. दरम्यान, सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानदेव सोनवणे हे कार चालवत होते. पत्नीसमवेत दशक्रिया विधी आटोपून ते घरी परतत होते. कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा