• Sun. Jun 14th, 2026

    Vijaypat Singhania: ‘रेमंड ब्रँड’ला जागतिक ओळख देणारे समुहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे निधन; उद्योगविश्व शोकाकुल

    Vijaypat Singhania: ‘रेमंड ब्रँड’ला जागतिक ओळख देणारे समुहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे निधन; उद्योगविश्व शोकाकुल

    Raymond Group Former Chairman: 20 वर्ष रेमंडचे नेतृत्व करून विजय सिंघानियांनी ब्रँडला एक जागतिक स्तरावर पोहोचवलं होतं. यासह त्यांनी 2006मध्ये पद्म भूषन पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: रेमंडला जागतिक दर्जावर घेऊन जाणारे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी सायंकाळी, 28 मार्च रोजी, मुंबई येथे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र व रेमंज ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी X वरील पोस्टद्वारे शनिवारी दिली. विजयपत सिंघानिया देशातील प्रसिद्ध उद्योगपतीसह पद्मभूषन पुरस्कार विजेते देखील होते. देशाच्या औद्योगिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते.रेमंड या सुप्रसिद्ध ब्रँडचं त्यांनी दोन दशके नेतृत्व केलं. 2000 या सालापर्यंत ते रेमंड ग्रुपचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी कंपनीचे सुत्रे त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्या हातात सोपवली आणि त्यांचा 37 टक्के वाटाही मुलाकडे हस्तांतरित केला. 1960मध्ये सुरू झालेल्या रेमंड वस्त्र ब्रँडला त्यांनी 1980 नंतर जागतिक स्तरावर पोहोचवलं. 1986मध्ये पार्क अव्हेन्यू हा परफ्यूमचा ब्रँडसुद्धा त्यांनी सुरू केला. भारतातील विस्तारानंतर 1990मध्ये त्यांनी रेमंडचं पहिलं विदेशी शोरूम उघडलं.
    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा