• Sun. Jun 21st, 2026

    Crime News: अंगावर जांभळ्या रंगाची साडी अन् रंग गोरा; कॅनॉलमध्ये गोणीत फेकली महिलेची बॉडी, हातावरील दोन शब्दांमुळे गूढ उकलणार

    Crime News: अंगावर जांभळ्या रंगाची साडी अन् रंग गोरा; कॅनॉलमध्ये गोणीत फेकली महिलेची बॉडी, हातावरील दोन शब्दांमुळे गूढ उकलणार

    Ahilyanagar Crime: पोलिसांकडून स्थानिकांच्या मदतीने गोणी पाण्याबाहेर काढण्यात आली. गोणीचा काही भाग फाटलेला असल्यामुळे त्यातून महिलेचा पाय दिसत होता व परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती.

    कॅनॉलमध्ये गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळली महिलेची बॉडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर: पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव शिवारात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. मुळा पाटबंधारे कॅनॉल इथं गोणीत बांधलेल्या अवस्थेत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना काल शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता उघडकीस आली असून, पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे

    मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डीतील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीजवळील कॅनॉलमध्ये स्थानिक नागरिकांना पांढऱ्या रंगाची गोणी संशयास्पदरीत्या तरंगताना दिसली. सदर गोणी दोरीने घट्ट बांधलेली असल्यामुळे या प्रकाराबाबत संशय बळावला. नागरिकांनी तात्काळ याबाबतची माहिती पाथर्डी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तपासणी केली.

    पोलिसांनी ही गोणी उघडताच अंदाजे ६० वर्षे वयाच्या महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यानंतर प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, धारदार शस्त्राचा वापर न करता कठीण आणि बोथट वस्तूने डोक्यावर किंवा शरीरावर प्रहार करून हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध महिलेच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

    हातावर काय गोंदवले आहे?

    मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचा रंग गोरा, उंची सुमारे १६० सेंटीमीटर, अंगावर जांभळ्या रंगाची नऊवारी साडी आणि काळा ब्लाऊज असून गळ्यात मंगळसूत्र व हातात काचेच्या बांगड्या आहेत. विशेष म्हणजे तिच्या उजव्या हातावर ‘पाच आसरा’ असे गोंदलेले आहे, हा महत्त्वाचा ओळखीचा पुरावा ठरत असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने हत्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

    दरम्यान, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेच्या हत्येप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून परिसरातील बेपत्ता महिलांच्या नोंदींची पडताळणीही सुरू आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा