• Fri. Jun 5th, 2026
    Crime News : बांगलादेशी चोरट्याची देशभर दुचाकीवरुन सफर अन् ठिकठिकाणी डल्ले; पुणे पोलिसांनी वाराणसीत पोहोचून मुस्क्या आवळल्या

    रॉयल एनफिल्ड ‘हिमालयन’वरून देशभर फिरून घरफोड्या करणाऱ्या सराईत बांगलादेशी चोरट्याला वाराणसीतून अटक करण्यात आली आहे. कर्वेनगरमधील स्टुडिओत चोरी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या.

    हिमालयन बाईकवरून देशभर फिरणाऱ्या बांगलादेशी चोरट्याला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : रॉयल एनफिल्ड ‘हिमालयन’वरून देशभर फिरून घरफोड्या करणाऱ्या एका सराईत बांगलादेशी चोरट्याला पुणे पोलिसांनी वाराणसीतून बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील कर्वेनगरमधील एका स्टुडिओत चोरी केल्यानंतर हा आरोपी तांत्रिक तपासाच्या जाळ्यात अडकला. धक्कादायक म्हणजे, हा चोरटा भारतात बनावट नावाने वावरत असून त्याच्यावर विविध राज्यांत ३६ गुन्हे दाखल आहेत. अलंकार पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    नेमकं काय घडलं?

    कर्वेनगरमधील एका स्टुडिओत झालेल्या घरफोडीचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. रॉयल एनफिल्ड हिमालयन बाईकवरून देशभर फिरत घरफोड्या करणारा बांगलादेशी सराईत गुन्हेगारच या चोरीमागे असल्याचे उघड झाले. अखेर अलंकार पोलिसांनी थेट वाराणसी गाठत त्याच्या मुसक्या आवळल्या.

    सीसीटीव्ही आधारे तपास

    १४ मार्चच्या मध्यरात्री कर्वेनगर परिसरातील फोटोग्राफी स्टुडिओची खिडकी फोडून आरोपीने आत प्रवेश केला होता. त्यानंतर कॅमेरे, लेन्स, ड्रोन आणि आयफोन असा सुमारे ६ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपीचा प्रवास उघड झाला. पुण्यातून तो हैदराबाद, चंद्रपूर, नागपूर, जबलपूर आणि मिर्झापूर असा मार्ग कापत उत्तर प्रदेशात पोहोचला होता. यानंतर अलंकार पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले.

    Maharashtra TimesNagpur Accident : कामठी महामार्गावर माजी हॉकीपटूचा अपघातात मृत्यू; ‘हिट अँड रन’चा प्रकार, सीसीटीव्हीच्या आधारे वाहन चालकाचा तपास सुरु

    पासपोर्ट जप्त

    महंमद बशर नूर महंमद (वय ३८, रा. ढाका, बांगलादेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो ‘नेवानाथ विनोदकुमार’ या बनावट नावाने भारतात वावरत असल्याचे समोर आले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल, विविध देशांचे चलन आणि बांगलादेशी पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

    सराईत गुन्हेगार

    आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आंध्र प्रदेश आणि तेलंगणात एकूण ३६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २९ गुन्ह्यांमध्ये तो यापूर्वी अटकेत होता, तर काही प्रकरणांमध्ये तो फरार होता. दरम्यान, या चोरट्याने देशातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारच्या घरफोड्या केल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा