Saptashrungi Devi Temple ST Buses: चैत्रोत्सवाच्या सप्तशृंगगडावर दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी (दि. २७) हजारो भाविकांनी ‘जय अंबे’चा घोष करीत भक्तिमय वातावरणात श्री भगवतीचे दर्शन घेतले.
चैत्र पोर्णिमा उत्सव हा सप्तशृंगगडावरील प्रमुख धार्मिक सोहळा असतो. उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक या उत्सवासाठी येत असतात. गडावर होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून जादा बसेसचे नियोजन करण्यात येते. यंदाही भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठ्या संख्येने बसेस सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
Rupali Thombare: भोंदूबाबा खरातच्या ‘रॅकेट’मागे चाकणकर! राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे-पाटील यांचा गंभीर आरोप
३ एप्रिलपर्यंत ही जादा वाहतूक सुरू राहणार आहे. याकरिता जिल्ह्यातील काही बसस्थानकांमध्ये जादा वाहतूक केंद्र उभारण्यात आले आहेत. निमाणी बसस्थानक, नांदुरी पायथा आणि सप्तशृंगगड वाहनतळ येथे महामंडळाने यात्रा वाहतूक केंद्र उभारले आहे. मालेगाव, मनमाड, सटाणा आणि नांदगाव येथूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
गडासाठी कोठून किती बसेस?
नांदुरी —१२०
मालेगाव —४५
मनमाड —१५
निमाणी —६५
सटाणा —०५
Ashok Kharat : कोंबडीचोरीमुळे बापाने घराबाहेर काढला, नानांनी 50 रुपये टेकवताच पळाला, बारा वर्षांनी हाँगकाँगहून पत्र, खरातचे प्रताप
भाविकांसाठी अनेक सुविधा
गडावर येणाऱ्या भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था, तसेच शिवालय तीर्थ येथे मोठ्या प्रमाणात निवारा शेड (मंडप) उभारण्यात आला आहे, ई-टॉयलेटची व्यवस्था, पाणपोई, चप्पल स्टँडची सोय करण्यात आली आहे. अखंडित वीजपुरवठ्यासाठी तीन जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून, गडपरिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे . यात्रेच्या कालावधीत ( दि. २६ मार्च ते ३ एप्रिल ) गडावर खासगी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून , नांदुरी येथून एसटी बसद्वारे भाविकांची ने-आण करण्यात येत आहे. तसेच गडापासून एक किमी अंतरावर सालाबादप्रमाणे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. दरम्यान, सुप्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी गुरुवारी (दि. २६) सप्तशृंगी देवीची आरती करून दर्शन घेतले.
