Police Arya Ballawar kills Father : जयंत बल्लावार यांची मुलगी आर्या हिचा एक्स बॉयफ्रेण्ड आशिष शेडमाडे याने नवीन पुरावे सादर केल्यानंतर या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चंद्रपूर : हेड कॉन्स्टेबलचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्याचं समजून बंद केलेली फाईल घटनेला तीन वर्ष उलटल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी पुन्हा उघडली आहे. हा पूर्वनियोजित खून असल्याचं समजून मयताच्या प्रशिक्षणार्थी पोलीस कन्येसह चौघांना चंद्रपुरात अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणीचा एक्स बॉयफ्रेण्डच फुटला. ड्युटीला निघालेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या मिल्कशेकमध्ये विष मिसळून त्याचा जीव घेण्यात आल्याचं समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
पोलीस कर्मचारी जयंत बल्लावार हे २५ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीजवळ कर्तव्यावर असताना कोसळले. त्यानंतर चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यावेळी या घटनेत कोणत्याही प्रकारच्या घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला नव्हता.
जयंत बल्लावार यांची मुलगी आर्या हिचा एक्स बॉयफ्रेण्ड आशिष शेडमाडे याने नवीन पुरावे सादर केल्यानंतर या प्रकरणाला एक निर्णायक वळण मिळालं. रामनगर पोलिसांना या प्रकरणातील परिस्थितीची नव्याने तपासणी करणे भाग पडलं. यातूनच मुलगी आर्या, स्वतः आशिष शेडमाडे (३०), चैतन्य ऊर्फ ‘मॉन्टी’ गेडाम (२२) आणि भद्रावती येथील एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली.
मुलीच्या अफेअरला विरोध
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्या आणि आशिष यांचे २०२२ पासून प्रेमसंबंध होते; मात्र जयंत यांचा तीव्र विरोध होता. या विरोधामुळेच घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते. आर्याला तिच्या लग्नातील प्रमुख अडथळा आपलाच पिता असल्याचे वाटत होते आणि म्हणूनच तिने आशिष व इतरांच्या मदतीने त्याला संपवण्याचा कट रचला, असा पोलिसांचा आरोप आहे.
या कटाचाच एक भाग म्हणून, एका अल्पवयीन मुलामार्फत विष मिळवण्यात आलं आणि माँटी गेडाम या मध्यस्थाकरवी ते ५००० रुपयांना आर्यापर्यंत पोहोचवण्यात आले. Ashok Kharat : कोंबडीचोरीमुळे बापाने घराबाहेर काढला, नानांनी 50 रुपये टेकवताच पळाला, बारा वर्षांनी हाँगकाँगहून पत्र, खरातचे प्रताप घटनेच्या दिवशी, विषमिश्रित मिल्कशेक प्यायल्यानंतर जयंत यांना अस्वस्थ वाटू लागले. ते ड्युटीवर असतानाच खाली कोसळले. केस रिओपन केल्यानंतर ऑटोप्सी अहवाल पाहिल्यावर विषबाधेवर शिक्कामोर्तब झालं. पुढील तपासात हा नियोजनबद्ध खून असल्याचं निष्पन्न झालं.
अशोक खरातचे पोलिस कोठडीत अजब दावे, SIT चौकशीत काय काय समोर आलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळी आर्या किंवा आशिष या दोघांपैकी कोणीही पोलीस दलात कार्यरत नव्हते. आशिष नंतर पोलीस दलात भरती झाला होता; मात्र गैरवर्तणुकीच्या कारणावरुन काही महिन्यांपूर्वीच त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. आर्याला तिच्या वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात नोकरी मिळाली असून सध्या तिचे प्रशिक्षण सुरू आहे. Ashish Meshram : चार मुलांच्या आईकडे लैंगिक सुखाची मागणी, नकार दिल्याने जीव घेतला, टीव्ही अभिनेता आशिष मेश्रामला अटक पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्या आणि आशिष यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्यानंतर या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. आशिषनेच पोलिसांकडे जाऊन या संपूर्ण कटाची माहिती उघड केली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा