Thane Crime News : सतत मागणी करुनही पगार मिळत नसल्याच्या रागातून डम्पर चालकाने ठेकेदार मालकाची कार फरफटत नेली. वाहनाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे.
वेतन थकीत डम्पर चालक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : पगार थकित राहिल्याच्या संतापातून एका डम्पर चालकाने थेट ठेकेदार मालकाची कार डम्परने तब्बल १० ते १५ फूट फरफटत नेत नुकसान केल्याची मोठी घटना डोंबिवली पश्चिमेतील राजनगर परिसरात घडली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत टिटवाळा ते माणकोली मोठागाव बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत विविध ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात कामगार व वाहनचालक काम करत आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून काही कामगारांचे पगार थकित असल्याची तक्रार आहे. वारंवार मागणी करूनही वेतन न मिळाल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारला फरफटत नेलं
मंगळवारी २४ मार्च रोजी या मार्गावर माती वाहतूक करणारा अवजड डम्पर जात असताना संबंधित ठेकेदाराची कार रस्त्याच्या मध्यभागी उभी होती. मालक कामाच्या पाहणीसाठी बाजूला गेला असताना डम्पर चालकाच्या नजरेस ही कार पडली. पगार न मिळाल्याच्या संतापातून चालकाने डम्परने कारला पुढून ढकलत अंदाजे १० ते १५ फूट फरफटत नेले. Twin Tunnels: ‘ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह’ दुहेरी बोगद्यांच्या कामाला वेग, पहिल्यांदाच रेल्वे आणि भुयारी मेट्रोखालून जाणार मार्ग
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
यानंतर ही कार समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या डम्परला धडकून अडकली. या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने वाहनात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. घटना घडल्यानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून निघून गेला. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार काही कामगारांनी मोबाईलवर चित्रीत केला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत. दरम्यान, प्राधिकरणाकडून देयके मंजूर होण्यात विलंब होत असल्याने ठेकेदारांवर आर्थिक ताण निर्माण झाला असून त्याचा परिणाम कामगारांच्या वेतनावर होत असल्याची चर्चा कामगारांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, महिना उलटला तरी कामावरील कामगारांना आपल्या कामाचा पगार मिळाला नाहीय. कष्टकरी वर्गातील हे कामगार आपल्या मालक ठेकेदाराकडे दररोज पगार देण्याची मागणी करत आहेत. सतत मागणी करुनही पगार मिळत नसल्याच्या कारणातून ही घटना घडली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा