• Sat. Jun 6th, 2026

    Ashok Kharat Crime: पतीला बाहेर थांबवलं, मला ऑफिसमध्ये बोलावून गुंगीचं औषध दिलं; खरातचं नवं कांड उघड, महिलेची तक्रार

    Ashok Kharat Crime: पतीला बाहेर थांबवलं, मला ऑफिसमध्ये बोलावून गुंगीचं औषध दिलं; खरातचं नवं कांड उघड, महिलेची तक्रार

    Nashik News: नराधम अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत असून त्याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एक बलात्काराचा तर दुसरा फसवणुकीच्या गुन्ह्याचा समावेश आहे.

    अशोक खरात प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्ध आता आणखी दोन गुन्हे दाखल झाले असून खरात याच्याविरोधातील अत्याचाराचे आठ आणि फसवणुकीचे दोन असे आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस खरातचा पाय आणखी खोलात जात असून पोलिसांच्या तपासाला वेग प्राप्त झाला आहे.

    अशोक खरातविरुद्ध नुकतीच एका पीडितेने खरातविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली आहे. ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान सदर महिलेवर खरातने अत्याचार केल्याचा आरोप आहे. “ऑगस्ट २०२४ मध्ये मला ऑफिसमध्ये बोलावून, पतीला बाहेर थांबायला लावलं. त्यानंतर खरातने मला गुंगीकारक पदार्थ मिश्रित पाणी प्यायला दिलं. त्यानंतर ‘मी महादेवाचा अवतार आहे’ असं भासवून माझ्या इच्छेविरुद्ध चार वेळा बलात्कार केला,” असा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आला आहे.

    अंगठ्या देऊनही केली खरातने फसवणूक

    व्यवसायात वृद्धी होण्यासाठी मंत्रांनी भारलेले पुष्कराज आणि हिरा देण्याचे आमिष दाखवत अशोक खरातने फसवणूक केल्याचा आरोप एका कापड दुकानदाराने केला आहे. डिसेंबर २०२२ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. फिर्यादीने स्वतःच्या २ आणि पत्नीची १ अशा एकूण ३ सोन्याच्या अंगठ्या (वजन २० ग्रॅम) खरातला दिल्या. खडे आणि अंगठ्यांच्या नावाखाली एकूण २,६२,००० रोख रक्कम खरातने घेतली. खरातला अटक झाल्याची बातमी वाचल्यानंतर फिर्यादीने अंगठ्या तपासल्या असता, त्या सोन्याच्या नसून पिवळ्या धातूच्या (तांब्याच्या) होत्या आणि त्यातील खडे खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

    अशोक खरातचे धक्कादायक दावे

    ‘एसआयटी’ तपासात खरातने धक्कादायक दावे केल्याचे समोर येत आहे. ‘मी माझ्या अंतर्मनाचे ऐकले नाही. त्यातून हा प्रकार झाला. ‘तो’ एक पूजा विधीचाच भाग होता. मी कोणत्याही महिलेकडे स्वतः गेलो नाही,’ असा दावा खरातने केल्याचे समजते. दरम्यान, खरातचा ‘एचआयव्ही’ अहवाल नकारात्मक असल्याचेही पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे; तसेच शुक्रवारी खरातच्या नियमित वैद्यकीय तपासातही कोणताही आजार निष्पन्न झाला नाही. त्यामुळे त्याची रवानगी पुन्हा पोलिस कोठडीत केल्याचे सूत्रांनी सांगितले.

    लैंगिक अत्याचार करणाऱ्या खरातने कुकर्मांसह खुनाचे अथवा नरबळी केल्याचा संशय ‘एसआयटी’ला असताना त्याच्या विदेश दौऱ्यामागेही भोंदूगिरी असल्याचे उघड झाले आहे. त्याने एका कुटुंबाला थेट विदेशात पूजा करण्याचा दावा करून दौरे घडवून आणले होते. या संदर्भात फॉरेन्सिक अहवाल समोर येणार आहे. त्याबाबत उद्या, नाशिक जिल्हा न्यायालयात खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह हरणांची काळी व पांढरी कस्तुरी खरातने कुठून आणली, पीडितेला खाण्यासाठी पेढा व पिण्यासाठी खारट, कडवट पाणी देत होता. हे प्यायल्यानंतर पीडितेला गरगरल्यासारखे व मळमळल्यासारखे व्हायचे. पीडितेवर त्यानंतर संशयित लैंगिक अत्याचार करायचा. हे पेढे व पाणी नेमके काय होते, तो कोठून आणत होता, त्यामध्ये काय मिसळत होता या संदर्भातही एसआयटी भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा