Pune Bribe Case: जुन्नर-आंबेगावच्या प्रांताधिकाऱ्याला एसीबीने २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. या घटनेनं महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय ४६, रा. प्रभात रस्ता, मूळ रा. सोनारी, नाशिक) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत, ४८ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
Pune Crime: महादेवाचा अवतार असल्याचं सांगून पुण्यातील महिलेवर लॉजमध्ये अत्याचार; स्वयंघोषित धर्मगुरूला अखेर अटक
गोविंद शिंदे हा जुन्नर-आंबेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाची भागीदारी बांधकाम कंपनी आहे. त्यांनी पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथे संयुक्त प्रकल्पात इमारत बांधणीचे काम हाती घेतले होते. या इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर अंशतः पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी त्यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे याच्याकडे प्रस्ताव सादर केला. शिंदे याने हा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठवून त्यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन तो स्वतःकडे राखून ठेवला.
Pune News : रामनवमीची मिरवणूक पाहताना पुण्यात महिलेचा करुण अंत, डीजेच्या दणदणाटाने हार्ट अटॅक आल्याचा कुटुंबाचा आरोप
मागील आठवड्यात तक्रारदार या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी गेले. त्या वेळी शिंदे याने अंशतः पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार, मंचर कार्यालयात गोविंद शिंदे यांना तक्रारदाराकडून तडजोडीअंती दोन लाखांची लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या पथकाने पकडले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
