• Sun. Jun 7th, 2026
    Sushant Dalvi Case : बांधकाम व्यावसायिकाला शिकार करताना संपवलं, सुशांत दळवी मृत्यू प्रकरणाचं गूढ उकललं; जवळच्याच माणसाने केला घात

    Sindhudurg Sushant Dalvi Killed Case : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. अशातच सिंधुदुर्गमधील कणकवलीमध्ये व्यावसायिक सुशांत दळवी यांची हत्या झाली आहे.

    बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एका बांधकाम व्यवसायिकाचा बंदुकीच्या गोळीने हत्या करण्यात आल्याने वातावरण तापलं आहे. सुशांत जनार्दन दळवी (मूळ रा. कळसुली तालुका कणकवली) असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास दळवी यांचा मृतदेह कणकवली जवळ मुरे डोंगरी येथे मिळाला आहे. या घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी तात्काळ अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम, पोलीस उपविभाग अधिकारी घनश्याम आढाव आदी पोलीस अधिकारी तसेच तपास यंत्रणांची पथके घटनास्थळी दाखल झाली होती.

    मुकादमानेच केली हत्या

    अवघ्या काही तासात या हत्या प्रकरणाचा तपास करत ही हत्या दळवी यांचा मुकादम अमर सत्यवान कदम यानेच केल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. कुडाळ ओरस परिसरातील असलेल्या अमर कदमला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी अमर याने गोळी घालून हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुशांत दळवी व अमर कदम हे दोघेही शिकारीसाठी गेले होते. दळवी यांना शिकारीचा छंद होता. या घटनेनंतर अमर याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. मात्र, ही हत्या कोणत्या उद्देशाने केली? ते अद्याप समजू शकलं नाहीय. याचा कणकवली पोलीस तपास करत आहेत.
    Maharashtra TimesAkola Crime : कौटुंबिक वादातून चुलत्याला संपवलं, काही तासांत प्रकरणाचं गूढ उकललं; वहिनीसह पुतण्याला अटक

    घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे

    कणकवली पोलीस निरिक्षक तेजस नलवडे, गुन्हा अन्वेषण शाखेचे उपनिरिक्षक अनिल हाडळ, फॉरेन्सिक लॅबचे पथक, गुन्हा अन्वेषण पथक, जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आदी तपासपथके घटनास्थळी दाखल झाली होती. दळवी यांचं पार्थिव पुढील कार्यवाईकरिता काल दुपारनंतर कोल्हापूर येथे पाठवण्यात आलं आहे.
    Maharashtra TimesPune News : रामनवमीची मिरवणूक पाहताना पुण्यात महिलेचा करुण अंत, डीजेच्या दणदणाटाने हार्ट अटॅक आल्याचा कुटुंबाचा आरोप
    याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या सगळ्या प्रकरणामागे अजून कोणाचा हात आहे का? या सगळ्याचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी अमर कदमला अटक केल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक आपल्या सहकाऱ्यांसह कणकवली पोलीस स्थानकात काल शुक्रवारी संध्याकाळी उशिरा दाखल झाले होते. त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा