• Sat. Jun 6th, 2026
    Solapur Accident : स्वयंपाकाच्या कामासाठी निघाले, वाटेतच काळाने घेरलं; दोघा मित्रांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

    Solapur Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, सोलापुरात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    सोलापूर तरुणांचा अपघाती मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील जुना बोरामणी चौकात आज शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. स्वयंपाकाच्या कामासाठी निघालेल्या दोन्ही मित्रांना ट्रकच्या वळणाचा अंदाज आला नाही. ट्रक चालकाने वळण घेतले, त्याचक्षणी या दोघा मित्रांनी थेट निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकने दोघांना चिरडलं. हुजुर अल्लाउद्दीन पटेल (वय ३५, रा. बोरामणी, दक्षिण सोलापूर) आणि सैफन शेख फरीद पटेल (वय ३६, रा बोरामणी, दक्षिण सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. स्वयंपाकाचे काम करण्यासाठी निघालेल्या दोघा मित्रांचा दुर्दैवी शेवट झाल्याने बोरामणी गावावर शोककळा पसरली आहे. हुजुर पटेल हा विवाहित असून भाऊ, बहीण आई असा परिवार आहे. तर सैफन पटेल हा देखील विवाहित असून पत्नी, तीन मुली व एक मुलगा त्याचा असा परिवार आहे.

    कार्यक्रमासाठी निघाले अन्…

    हुजुर पटेल आणि सैफन पटेल हे दोघे मित्र होते. ते एकमेकांच्या घरासमोर राहावयास होते. जीवलग मित्रांनी स्वयंपाकाचा व्यवसाय सुरु केला होता. आज शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेवाडी येथे एका कार्यक्रमात स्वयंपाक करण्यासाठी ते निघाले होते. बोरामणीहून गुंजेगाव येथे जाताना, जुना बोरामणी चौकात सिग्नलजवळ वळण घेताना त्यांना ट्रकने चिरडले. बोरामणी गावात अपघाताची माहिती मिळताच सर्व ग्रामस्थ शासकीय रुग्णालयात दाखल झाले. सोलापूर शहरातील बोरामणी नाका परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
    Maharashtra TimesNarhari Zirwal: झिरवाळांनी व्हिडिओबद्दल स्वतःच CM ना फोन केलेला, काय-काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

    सीसीटीव्हीत भीषण अपघाताचे कैद

    आज शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या ट्रक आणि मोटरसायकलमध्ये जोरदार धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका गंभीर होता की, दोघांनाही कोणतीही मदत मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक आणि दुचाकी यांच्यात वळण घेताना हा अपघात झाला. अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा