• Sat. Jun 6th, 2026
    Rupali Thombare: भोंदूबाबा खरातच्या ‘रॅकेट’मागे चाकणकर! राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे-पाटील यांचा गंभीर आरोप

    Rupali Thombare On Rupali Chakankar: पोलिसांकडे हे ‘पेन ड्राइव्ह’ फार उशिरा पोहोचले आहेत. जे पुरावे समोर येत आहेत, त्यानुसार या ‘रॅकेट’मागे चाकणकर असाव्यात,’ असा आरोप रूपाली ठोंबरे-पाटील यांनी केला.

    अशोक खरात प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘शिर्डी पोलिसांत मॉर्फ व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत राज्य महिला आयोगच्या तत्कालीन अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दबाव आणला होता. विविध मुद्द्यांमुळे त्रासलेल्या पीडिता जेव्हा महिला राज्य आयोगाकडे समुपदेशनासाठी येत होत्या, त्यावेळी ग्रह-तारे-योग तपासून बघा, त्यासाठी नाशिकच्या ‘बाबा’कडे जा, असे सांगून संबंधित प्रकरण वेगळ्या पद्धतीने वर्ग होत होते.

    जे पुरावे समोर येत आहेत, त्यानुसार या ‘रॅकेट’मागे चाकणकर असाव्यात असे दिसते,’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तथा झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी शुक्रवारी येथे केला.

    भोंदूबाबा अशोक खरातच्या अत्याचार प्रकरणात तपासाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे, प्रियदर्शनी वूमेन्स फोरम बिटिया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. हे सर्वजण आयुक्तालयात पोहोचले. त्यांनी आयुक्तांना निवेदन देत भूमिका मांडली. परंतु, नाशिक शहरात खरातविरुद्ध पहिला गुन्हा नोंद झाल्यानंतर विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हे प्रकरण वर्ग झाले. हा गुन्हा नोंद होण्यापूर्वीच ‘एसआयटी’ नेमलेली होती. त्यामुळे तपासाबाबत ‘एसआयटी’प्रमुखांकडे सविस्तर माहिती उपलब्ध होईल, असे आयुक्त कर्णिक यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पदाधिकारी ‘एसआयटी’प्रमुख तेजस्वी सातपुरे (आयपीएस) यांच्या भेटीसाठी महाराष्ट्र पोलिस अकादमीत रवाना झाले.

    Maharashtra TimesPune Land Scam: अपर तहसीलदारांना सक्तीची रजा; पुणे जिल्ह्यातील जमीन नोंदी फेरफार प्रकरणी आदेश
    दरम्यान, आयुक्तांच्या भेटीनंतर रूपाली ठोंबरे-पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ‘जे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत, त्यापैकी बऱ्याच महिलांच्या तक्रारी यापूर्वी महिला आयोगाकडे गेल्या होत्या. पुणे शहरात जे कोणी लोक पोहोचले होते, त्यांनी हे प्रकरण का दाबले याचा तपास व्हावा. एक नव्हे अनेक ‘पेन ड्राइव्ह’ आहेत.

    Maharashtra TimesSushma Andhare : अशोक खरातसोबतचे हेमंत गोडसे, अतुल सावेंचे फोटो दाखवत सुषमा अंधारे संतापल्या; दीपक केसरकरांच्या एसआयटी चौकशीची केली मागणी
    ‘खरात प्रकरणात पीडितांचा कौटुंबिक वाद विकोपाला गेला आहे. अनेकांच्या घरात आता ‘डीएनए टेस्ट’पर्यंत प्रकरण पोहोचले हे. काही वर्षांपूर्वी तृप्ती देसाईंपर्यंत हे व्हिडीओ पोहोचले होते. त्यावेळी त्या पोलिसांत गेल्या होत्या, तर तपास का झाला नाही? कारण, त्यावेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. चाकणकरांनी ‘तोडपाणी’ केल्याचा संशय आहे,’ असेही ठोंबरे-पाटील म्हणाल्या.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा