• Mon. Sep 7th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर


Latest Marathi News: पश्चिम आशियातील युद्धतिढ्यात होर्मुझची सामुद्रधुनी हा केंद्रबिंदू ठरला असून, युद्धविरामाच्या प्रस्तावानंतरही इस्रायल, अमेरिका आणि इराणने हल्ले सुरूच ठेवले आहेत. होर्मुझवरील इराणच्या नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावणारे रिव्हॉल्युशनरी गार्ड्सच्या नौदलाचे प्रमुख अलीरझा तन्सगिरी हे हल्ल्यात ठार झाल्याचे इस्रायलने गुरुवारी जाहीर केले. तर, अमेरिकेने आखातात युद्धनौकांसह हजारोंच्या सैन्यतैनातीची तयारी केल्याने युद्धसंकट तीव्र झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा वादात सापडले आहेत. एका तृतीयपंथीसोबतच्या त्यांच्या कथित व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा कोंडी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed