Pune Metro Tunnel Damaged: काही दिवसांपूर्वी पुणे मेट्रो लाइन 3च्या मंडई मेट्रो स्थानकाजवळ अनाधिकृत बोरअवेलच्या कामांमुळे बोगद्याला छिद्र पडले. त्यानंतर मेट्रो प्रशासन आणि महापालिकेने काही काठोर पावले उचलली आहेत.
म.टा. प्रतिनिधी, पुणे: भूमिगत मेट्रो मार्गांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण करणाऱ्या बोअरवेलच्या घटनेनंतर महापालिकेने कठोर भूमिका घेतली असून, मेट्रो बोगद्यांवर आणि परिसरातील सर्व बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र व सविस्तर नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांद्वारे प्रत्येक बांधकामावर बारकाईने नजर ठेवली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल
शुक्रवार पेठेत खडक पोलिस ठाण्यासमोर बोअरवेल खोदताना मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडले. स्वारगेट-शिवाजीनगर मार्गावरील बोगद्यात पाण्याची गळती सुरू झाल्यानंतर मेट्रो प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित घरमालक व ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला.Pune Metro: पुणे मेट्रोच्या बोगद्याला खड्डा, परवानगीविना स्थानकाजवळ बोअरवेलचं काम; मुंबईनंतर पुण्यातही तोच प्रकार
या घटनेनंतर महापालिका आणि मेट्रो प्रशासन अधिक सजग झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व्यापक उपाययोजना आखण्यात येत आहेत. पेठ भागांतील प्रलंबित पुनर्विकास प्रकल्प आणि सुरू असलेली बांधकामे लक्षात घेऊन मेट्रो बोगद्यांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या बांधकामांवर नियंत्रणासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे. नव्या नियमावलीनुसार, मेट्रो बोगद्यांच्या वर किंवा परिसरातील प्रत्येक बांधकामासाठी स्वतंत्र तांत्रिक परवानगी अनिवार्य असेल. बोअरवेल खोदकामासाठी भूजल विभागाची स्वतंत्र मंजुरी बंधनकारक असेल. सुरक्षित अंतर, कंपन नियंत्रण, तांत्रिक निकष आणि मेट्रो संरचनेवरील परिणामांचा विचार या नियमावलीत केला जाईल.
शुक्रवार पेठेतील घटना अत्यंत गंभीर असून, भविष्यात मेट्रो प्रकल्पाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी लवकरच कठोर नियमावली जाही केली जाईल अशी माहिती पुण्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली आहे.
Pune News: पुण्यातील वाहतूक कोंडीवर दिलासा, तळेगाव-शिक्रापूर महामार्गाला मंजुरी; नवले पूल परिसरात उन्नत मार्गाचा प्रस्ताव
‘महामेट्रो’च्या नावाने बनावट वेबसाइट
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) नावाने बनावट वेबसाइट आणि फेसबुकवर खोटे पेज तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना लक्ष्य करून भरतीच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्या जाहिराती त्यावर प्रसारित केल्या जात असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महामेट्रोकडून सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकृत वेबसाइटसारखीच दुसरी वेबसाइट बनवल्याचे लक्षात आले. या फसव्या बनावट वेबसाइटसाठी ‘महामेट्रो’चा अधिकृत लोगो वापरून जाहिराती विश्वासार्ह भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अनेक उमेदवार या जाळ्यात अडकण्याची भीती आहे
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा