कल्याण: कल्याण परिसरात एका अल्पवयीन मुलाचा बेजबाबदारपणा रस्त्यावर सायकलिंग करणाऱ्या व्यवसायिकाच्या जीवावर बेतला आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा थरारक व्हिडिओ समोर आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. कल्याण परिसरातील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास तांदळे यांचा या भीषण अपघातात दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा घरातील कारची चावी घेऊन तो कल्याण येथे असलेल्या रिंगरूट रस्त्याने निघाला होता. याचदरम्यान त्याचा कारवरील ताबा सुटला आणि रात्री आजच्या सुमारास या रस्त्यावरून सायकलिंग करत जाणारे उद्योजक श्रीनिवास तांदळे यांना या कारची जोरदार धडक बसली. यातच त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा भीषण झाला. कल्याण पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाच्या आईवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण येथील चांदोरी जवळून जाणारा रिंग रोड हा अलीकडे भरधाव कारचालकांमुळे अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. या रिंग रोडवर सुरू असलेले मुजोर वाहन चालकांचे स्टंट आता थेट मॉर्निंग वॉक करणारे नागरिक व सायकलिंग करणाऱ्यांच्या जीवावरती बेतू लागले आहेत. या सगळ्या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कल्याणमधील सायकलिंग करणाऱ्या ग्रुपमधील सायकलधारकांकडूनही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
हा भीषण अपघात झाला त्या रस्त्यावर याआधी पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी ते हटवण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अपघात घडू लागले आहेत, अशी माहिती सायकलिंग करणाऱ्या व्यक्तींकडून देण्यात आली आहे. या सगळ्या विरोधात सायकलिंग ग्रुपकडून आज गुरुवारी आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे. या अगोदर कल्याण पोलिसांनी गंभीर दखल घेत संबंधित कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघाताप्रकरणी अधिक तपास कल्याण पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा