• Tue. Jun 16th, 2026
    राज्यातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर


    Live News in Marathi: शिवसेना (उबाठा) पक्षात पुन्हा फूट पडण्याची चर्चा असताना धोका टाळण्यासाठी पक्षाने बैठकसत्र सुरू केले आहे. खासदारांची नुकतीच बैठक घेतलेल्या ‘उबाठा’ने येत्या २२ जूनला आमदारांची बैठक बोलावली आहे. मोटार वाहन विभागातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षे झाली आहेत. मात्र सेवाप्रवेश नियम रखडले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असल्याचे सांगत कर्मचारी संघटनेने आज, मंगळवारपासून संप घोषित केला आहे. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत १०.७२ टक्के पाणीसाठा आहे. २० जूननंतर या साठ्याचा आढावा घेऊन सध्याच्या दहा टक्के पाणीकपातीत आणखी वाढ करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडेही लक्ष लागले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed