• Wed. Jun 17th, 2026
    Jayant Patil: राज्यातील स्मार्ट मीटर योजनेला स्थगिती द्या! जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    Jayant Patil: सर्वसामान्य नागरिक, घरगुती ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा पाटील यांनी निवेदन देताना केला.

    स्मार्ट मीटर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यातील वाढीव वीजबिले, थकीत दंड आणि स्मार्ट मीटर योजना स्थगित करावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी केली.

    ‘या योजनेच्या अंमलबजावणीनंतर लोकांना मिळालेली प्रचंड वाढीव वीजबिले आणि त्यासोबत आकारण्यात आलेला थकीत दंड यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शेजारील गोवा राज्यात याच गंभीर समस्येची दखल घेत तेथील मुख्यमंत्र्यांनी जनहितार्थ स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिली आहे, तसेच वाढीव बिलांची आणि अन्यायी दंडाची प्रकरणनिहाय तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत’, असे पाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे. राज्यातील अनेक भागांत आंदोलने सुरू झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

    Maharashtra TimesUddhav Thackeray : उबाठाचे सात खासदार फुटण्याच्या चर्चा, धोका टाळण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन, सहा दिवसांनी काय घडणार?
    ‘वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये’
    ‘नागरिकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेस त्वरित स्थगिती देण्यात यावी. आत्तापर्यंत आलेल्या सर्व वाढीव बिलांची आणि अतिरिक्त दंडभाराची प्रकरणनिहाय स्वतंत्र पडताळणी करण्यात यावी, ही पडताळणी पूर्ण होईपर्यत ग्राहकांवर झालेली अन्यायकारक दंड आकारणी रद्द करण्यात यावी आणि कोणात्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये. तसेच, ग्राहकांना त्यांचा मंजूर वीजभार वाढवून घेण्यासाठी पुरेशी पूर्वसूचना आणि मुदत देण्यात यावी’, अशा मागण्या पाटील यांनी केल्या.

    Maharashtra Timesपावसाळी अधिवेशनाचं बिगुल वाजलं! 22 जूनपासून होणार सुरु, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
    ‘स्मार्ट मीटर’च्या विरोधात एल्गार
    वितरणकडून स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार आहे. या सक्तीच्या विरोधात सोमवारी कल्याणमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी महापौर हर्षाली थविल आणि शहरप्रमुख रवी पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कारभाराचा निषेध म्हणून अधिकाऱ्यांच्या दिशेने बांगड्या फेकत आपला रोष व्यक्त केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा