• Mon. Jun 15th, 2026

    Nashik Accident: खड्ड्यांचा आणखी एक बळी! अंबड लिंकरोडवर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, नागरिकांचा संताप

    Nashik Accident: खड्ड्यांचा आणखी एक बळी! अंबड लिंकरोडवर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, नागरिकांचा संताप

    Nashik Accident: जीवघेण्या खड्ड्यांमुळे काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर जीवघेणा अपघात झाला होता, आता आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

    नाशिक अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, सिडको/सातपूर : अंबड लिंकरोडवर एकेरी वाहतूक आणि खड्डेमय रस्त्यामुळे झालेल्या टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास इंडियन ऑइल पेट्रोलपंपासमोर घडली.

    प्रभाकर साहेबराव निकम (वय ४२, रा. संजीवनगर) असे मृताचे नाव असून, संजीवनगर येथील प्रगती गारमेंट्स या कपडे विक्रीच्या दुकानाचे ते संचालक होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी मुलगा, मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे. सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले निकम कुटुंब मूळचे महाळपूर (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील आहे. या प्रकरणी अंबड एमआयडीसी पोलिस चौकीत टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesNashik Crime : मित्रांसोबत गप्पा मारताना बेदम मारहाण, किरकोळ वादातून मध्यरात्री तरुणाला संपवलं; नाशिकमधील घटना उघडकीस
    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंक रोडवरून संजीवनगरकडे जाणाऱ्या टेम्पोने (एमएच १५, जेसी ८८७७) या खड्डेमय रस्त्यावरील विराट संकुल येथील घातक वळणावर सावकरनगर, अशोकनगर येथील घराकडे निघालेल्या निकम यांच्या दुचाकीस (एमएच १५, एफआर ४६२०) पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे वळणावर पडलेल्या डांबराच्या ढिगावर जाऊन आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त करीत अपघातस्थळावरील पथदीप बंद होते, ठेकेदाराने सूचनाफलक व रिफ्लेक्टरदेखील लावले नसल्याचा आरोप केला.

    गुन्ह्यासह भरपाईची मागणी
    सिंहस्थविषयक कामांमुळे अंबड लिंकरोडवर सध्या एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. मात्र, त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने दररोज हजारो कामगार आणि अवजड वाहनांची वर्दळ असते. मात्र, तरीही या रस्त्याची दुरवस्था कायम असून, त्यास कारणीभूत ठेकेदारासह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, घरातील कर्ता पुरुष गेल्याने महापालिकेने भरपाई द्यावी, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांसह स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच कामगारांनी केली आहे.

    Maharashtra TimesMalegaon News : सिझेरियनद्वारे प्रसूतीनंतर 21 वर्षीय महिलेचा मृत्यू, हॉस्पिटलच्या हलगर्जीने साक्षी गेली, कुटुंबाचा संताप
    अपघातानंतर दुहेरी वाहतूक
    प्रभाकर निकम यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर बुधवारी ठेकेदाराने विराट संकुलच्या वळणावर पडलेले डांबरचे ढिगारे हटवत दुहेरी वाहतूक सुरू केली. अपघाताच्या ठिकाणी वाहतूक पोलिस, वॉर्डनची नियुक्ती केल्याचे दिसून आले. रस्त्यात इतस्ततः टाकलेली माती ठेकेदाराने रात्रीतून हटविल्याचे वाहनचालकांनी सांगितले.

    Maharashtra TimesAshok Kharat : खरातच्या केबिनमध्ये महिला शिरताच झुंबर बंद, कर्मचाऱ्यांसाठी नो एन्ट्रीचा ‘कोडवर्ड’, थक्क करणारे कारनामे
    कारवाईसाठी नगरसेवकांचा ठिय्या
    नाशिक : निकम यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक नितीन दातीर आणि निवृत्ती इंगोले यांनी आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. नगरसेवकांसह प्रभागातील नागरिकांनी आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली. संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

    या अपघातप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, तसेच महापालिकेने मृताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी. येथील रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल. –समाधान देवरे, नगरसेवक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा