• Sun. Sep 6th, 2026
अंकशास्त्रज्ञ म्हणवणारा अशोक खरात दहावीला गणितात नापास, शाळेतलं मूळ नाव ‘लक्ष्मण’, 1995 नंतर गौडबंगाल

Nashik Woman Assault Case : ग्रामीण परिस्थितीत वाढलेला हा मुलगा शिक्षणासाठी वावी येथील माध्यमिक शाळेत जात असे. त्या काळात शाळेच्या नोंदींमध्ये त्याचे नाव ‘लक्ष्मण एकनाथ खरात’ असे आढळले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : अनेकांना जन्मतारीख ऐकून अंकशास्त्र सांगणारा, भविष्य वर्तवणारा आणि स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात सध्या महिला लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत आहे. मात्र, लोकांना अंकशास्त्र शिकवणारा खरात हा दहावीच्या परीक्षेत गणितात चक्क नापास झाल्याची माहिती समोर आली आहे.

गणितात नापास

सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) हे खरातचे मूळ गाव आहे. साधारण ग्रामीण परिस्थितीत वाढलेला हा मुलगा शिक्षणासाठी वावी येथील माध्यमिक शाळेत जात होता. त्या काळात शाळेच्या नोंदींमध्ये त्याचे नाव ‘लक्ष्मण एकनाथ खरात’ असे होते. मार्च १९८३ मध्ये त्याने बैठक क्रमांक सी-५२३४१ वरून दहावीची परीक्षा दिली. त्या परीक्षेत तो गणित आणि समाजशास्त्र या दोन विषयांत नापास झाल्याचे त्याच्या गुणपत्रिकेत स्पष्ट दिसते. गुणपत्रिकेनुसार त्याला मराठी विषयात ३९, इंग्रजीत ३७, गणितात २८, विज्ञानात ६२, समाजशास्त्रात ३८ आणि हिंदीत ४७ असे एकूण २५१ गुण मिळाले होते. एकूण टक्केवारी ३५.८६ इतकी होती.
Maharashtra Timesकार दुभाजकावर आदळून उलटली, प्रसिद्ध अभिनेत्री Harshil Kalia हिचा मृत्यू, ऐन तिशीत जगाचा निरोप

१५४ देश फिरल्याचा दावा

गावाकडच्या साध्या जीवनातून पुढे आलेल्या अशोक खरातने पुढे स्वतःला ‘कॅप्टन’ अशी बिरुदावली लावली. जन्मतारीख ऐकून अंकशास्त्र सांगणे, भविष्य वर्तवणे आणि १५४ देशांत फिरल्याचा दावा करत त्याने स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. अनेक लोक त्याच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागले. आज त्याच्या शैक्षणिक वास्तवाची माहिती समोर आल्यानंतर लोकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अंकशास्त्राचा दावा करणारी व्यक्ती गणितातच नापास होती, ही बाब अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरत आहे. ग्रामीण भागातील एक विद्यार्थी पुढे भोंदू ज्योतिषी आणि अंकशास्त्राचा तज्ज्ञ कसा झाला, याच्या चर्चा आता झडत आहेत.

खरात प्रकरण बड्या नेत्यांना अडकवणार? फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

Maharashtra TimesNalasopara Girl Death : भटक्या कुत्र्याचं नख लागलं, इंजेक्शनच्या भीतीने उपचार टाळले, नऊ वर्षीय मुलीचा सहा महिन्यांनी रेबीजने मृत्यू

शाळेतील नाव लक्ष्मण

अशोककुमार खरात या नावाने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीचे शाळेतील मूळ नाव ‘लक्ष्मण’ होते. १९९५ मध्ये त्याने शाळेतून दाखला काढल्याची माहिती मिळते. त्यानंतर गॅझेटच्या माध्यमातून त्याने आपले नाव अशोककुमार खरात असे बदलले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा