LPG Gas Cylinder: गॅस एजन्सीला फोन करून, बाहेर रांगा लावून आणि गॅसच्या गाडीमागे धावूनही पिंपरीतील नागरिकांना सिलिंडर मिळत नाही आहे. काळाबाजार आणि साठेबाजीमुळे हे हाल होता असल्याचे आरोप केले जात आहेत.
राजा गायकवाड, पिंपरी : घरगुती गॅस सिलिंडरसाठी नियमानुसार बुकिंग करूनही वेळेत गॅस मिळत नसल्याने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. ३० दिवसानंतर गॅस बुकिंग करून, त्यानंतर १० दिवस उलटल्यानंतरही नागरिकांना गॅस मिळत नाही. शाहूनगर, चिखली, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरात ही समस्या तीव्र झाली आहे. गॅस एजन्सीच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे. गॅस एजन्सीकडून साठेबाजी; तसेच काळाबाजार केल्यानेच नागरिकांना गॅस सिलिंडर मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे.
आठ-दहा दिवसांनीही गॅस मिळेना
गॅस बुकिंगसाठी सुमारे ३० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, बुकिंग झाल्यानंतरही सिलिंडर कधी मिळणार याबाबत कोणतीही स्पष्टता दिली जात नाही. अनेक नागरिकांनी बुकिंग करून आठ ते दहा दिवस उलटूनही गॅस मिळालेला नाही.Pune News : पुणे महापालिकेचा महिलांसाठी संवेदनशील निर्णय; पिंक रुम, मोफत स्वच्छतागृह ते बचत गट, विविध उपक्रमांची घोषणा
शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरात चिंचवडच्या राका गॅस एजन्सीकडून भारत गॅसचा पुरवठा होत होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अचानक यांच्याकडील सर्व कनेक्शन अनुसया गॅस एजन्सीकडे ट्रान्सफर केले गेले. याबाबत ग्राहकांना सांगितले नाही. ‘अनुसया आणि रतन गॅस एजन्सी संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या दोन्ही एजन्सीची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये दोषी आढळल्यास या एजन्सीवर कारवाई करण्यात येईल,’ अशी माहिती चिंचवडचे पुरवठा अधिकारी डॉ. विजयकुमार यांनी दिली आहे.
Pune Accident : रात्रीच्या अंधारात काळाचा घाला, चिंचवडच्या कुटुंबाची कार बसखाली घुसली, आई-वडील-आजीचा मृत्यू, दोन लेकरं पोरकी
नागरिक त्रस्त
दरम्यान, शाहूनगर येथील एका गृहिणीला या समस्येबद्दल विचारल्यावर त्यांनी, ‘मी शाहूनगर येथे राहते. मी १७८ मार्चला गॅस बुक केला. गॅस सिलिंडर डिलिव्हरीसाठी निघाल्याचा मेसेज आला. मात्र, आठ दिवस उलटूनही मला सिलिंडर मिळाला नाही. अनुसया गॅस एजन्सीला फोन केले. मात्र, कॉल उचलले नाहीत,’ अशी तक्रार केली. तसेच शाहूनगर येथील आणखी एक रहिवासी ललित शिरोडकरांनी, ‘गॅस बुक करून दहा दिवस होऊन गेले. मात्र, अजून गॅस सिलिंडर मिळाला नाही. गॅसची गाडी आली की मी धावत जातो. मात्र, तुमचा गॅस नाही आला, असे सांगितले जाते. सध्या मित्राच्या घरातून गॅस सिलिंडर आणून वापरत आहे,’ असे सांगितले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा