NMIA Metro: नवी मुंबई विमानतळावरून प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहे. 29 मार्चपासून विमान उड्डाणांमध्ये वाढ होणार असून मेट्रो, रेल्वे स्थानक आणि बससेवेला थेट जोडणी देण्यात येणार आहे.
नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळावर उड्डाणे सुरू होऊन जवळपास 3 महिने झाले आहेत. प्रवाशांना विमानतळावर पोहोचवण्यापासून त्यांना घरापर्यंत कनेकटीव्हीटी देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी विमानतळावर एक पॅसेंजर इंटरजेंज तयार करण्यात येणार आहे. या इंटरचेंजद्वारे सुमारे 4 मेट्रो मार्गिकांना जोडण्यात येणार आहे. या शिवाय विमान सेवांचा महाराष्ट्रात विस्तारही करण्यात येणार आहे.
पायाभूत सुविधांसाठी मागणी
सध्या नवी मुंबई विमानतळाजवळ कोणत्याही रेल्वे स्थानक किंवा मेट्रोची व्यवस्था नाही. यामुळे नागरिकांना टॅक्सी व कॅब बुक करून विमानतळापर्यंत पोहोचावं लागतं. नवी मुंबई विमानतळावर सध्या 24 तास उड्डाणे सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह अनेक भागांतून नागरिक येथे येतात. अशावेळी कॅब व टॅक्सीचे भाडे सर्व सामान्यांना परवडणारे नसून वाहतूककोंडीतही प्रवाशांचा वेळ जातो. त्यात विमानतळावर नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे कॅब बुक करणं पण कठीण होतं. अशा वेळी सार्वजनिक वाहतूक प्रवाशांसाठी उत्तम पर्याय ठरते. त्यामुळे नागरिकांकडून या सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.Mumbai Local: मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार, 34 रेल्वे स्थानकांचा विस्तार सुरू; कल्याण-कसारा, खोपोली मार्गावर फायदा
कसे असतील मेट्रो मार्ग?
मुंबई ते नवी मुंबई जोडणारी मेट्रो लाइन 8 नवी मुंबई विमानतळाला जोडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2पासून ही मार्गिका सुरू होणार असून थेट नवी मुंबई विमानतळाला जोडेल. या टर्मिनलवरील मेट्र 8च्या स्थानकावर मेट्रो लाइन 7 आणि 3 शी जोडणी मिळणार आहे. याशिवाय मेट्रो लाइन 8 वरून प्रवाशांना मेट्रो लाइन 4, मेट्रो लाइन 2 आणि नवी मुंबई मेट्रो लाइन 1साठी प्रवासी इंटरचेंज तयार केले जाणार आहेत. यामुळे नवी मुंबई विमानतळावरून 4 मेट्रो सेवा उपलब्ध होतील.
Prabhadevi Bridge: प्रभादेवीमध्ये उभारणार ‘डबल डेकर पूल’, 100 वर्ष जुन्या रेल्वे पुलाचं पाडकाम निम्म्यावर; शिवडी-वरळी कनेक्टर’ला वेग
आमदार सत्यजित तांबेंनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना ही माहिती देण्यात आली. शिवाय एका लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवी मुंबई विमानतळाच्या सेवेचा विस्तार होणार असल्याची माहिती दिली. 29 मार्चपासून विमानसेवांची संख्या 76 होणार असून कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसाठीही उड्डाणे सुरू होणार आहेत. तसेच, नवी मुंबई मेट्रो मार्गिका 8 साठी सविस्तर प्रकल्प अहवालसुद्धा तयार असून लवकरच या प्रकल्पाचं काम ही सुरू होईल.
दरम्यान, 4 मेट्रोंसह नवी मुंबई विमानतळापासून कुर्ला रेल्वे स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मानखुर्दच्या अंतरराज्य बस टर्मिनसलाही जोडणी मिळणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा