Chhatrapati Sambhajinagar Retired Professor Found Dead : छत्रपती संभाजीनगरमधील सेवानिवृत्त राजाभाऊ लोंढे हत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.
आरोपींना २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी
प्रा. राजाभाऊ लोंढे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विशाल राठोड आणि करण आढे या दोघांना रविवारी (२२ मार्च) रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी उर्वरित रक्कम, पिस्तुलाचा स्रोत आणि इतर सहकारी यांचा उलगडा करण्यासाठी वाढीव कोठडीची मागणी केली होती. तपास यंत्रणांनी या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली. न्या. एस. आर. पवार यांनी दोन्ही आरोपींना २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Kolhapur Crime: 19 वर्षीय तरुणी कोल्हापुरातून गायब, लग्नाच्या आमिषाने पळवल्याचा आरोप; अखेर लोकेशन मिळालं, तरुणालाही ताब्यात घेणार!
पिस्तुलाबाबत खोटी माहिती
प्रा. लोंढे यांच्या खुनासाठी आरोपींनी वापरलेल्या पिस्तुलाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता, आधी विशाल राठोडने हे पिस्तूल उज्जैन येथून खरेदी केल्याची माहिती दिली. पोलिसांनी विशाल राठोडची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने हे पिस्तूल राजस्थानातील धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या एका शहरातून आणल्याचे सांगितले.
जॅग्वार खेरदी केल्याची माहिती
पोलिस कोठडी दरम्यान पोलिसांनी विशाल राठोड याला लोंढे यांच्याकडून घेतलेल्या ६५ लाखांबाबत विचारणा केली. या प्रकरणात विशाल राठोडने बारा लाख रुपयांची जॅग्वार कार खरेदी केल्याचे सांगितले. या व्यवहारातील उर्वरित रकमेबाबत त्याने अद्याप कोणतीही बातमी दिलेली नाही. खरेदी केलेली जॅग्वार अपघातग्रस्त झाल्याने कोकणवाडी येथील बॉम्बे ऑटो वर्क्स गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली होती. पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे.
Nashik Crime : 24 दिवसांपासून बेपत्ता नर्सची बॉडी विहिरीत सापडली, नाशकात खळबळ, दूध विक्रेत्याला अटक
तपासासाठी पुण्यात पथक
या प्रकरणात मारेकरी विशाल राठोडसह अन्य आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात विशाल राठोड याने त्याच्याजवळील एक मोबाईल हा पुण्यात लपवून ठेवल्याचीही माहिती दिली. हा मोबाईल जप्त करण्यासाठी पुण्याला पथक रवाना होणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
