Nashik Nurse Found Dead : महिलेला जीवे मारून तिचं शव विहिरीत टाकल्याचं दूध विक्रेत्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला, तेव्हा विहिरीत तिची बॉडी आढळून आली.
काय आहे प्रकरण?
रंभाबाई काळे (रा. मामलेदार चौक, निफाड) या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा भाचा प्रवीण घायाळ यांनी निफाड पोलिस ठाण्यात २४ फेब्रुवारी रोजी दाखल केली होती. निफाड पोलिसांनी घटनेचा तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या साहायाने मोबाइलमधील सीडीआर तपासला. त्यात संशयित क्रमांक आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निफाड येथील अरुण बाजीराव ढेपले (वय ४०) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न
त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले. मात्र, प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे कानावर आल्यानंतर संशयित अरुण ढेपले याने विष प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर निफाड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपाचारादरम्यान त्याने पोलिसांजवळ खुनाची कबुली दिली.
Nagpur Crime : 24 वर्षीय मुलाच्या मित्राशी 48 वर्षीय आईचे अनैतिक संबंध, घरातून पळाले, नागपुरातील गावात चर्चा, दृष्टीहीन पतीचा टोकाचा निर्णय
संबंधित महिलेला जीवे मारून निफाड जवळ जुना देवपूर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत तिचं शव टाकल्याचं त्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला, तेव्हा विहिरीत तिची बॉडी आढळून आली.
Dhananjay Munde, Kokate, Chakankar आणि आता Tatkare? NCP पुन्हा गोत्यात
हत्येचं कारण काय?
संशयित अरुण हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो. दूध देण्याच्या निमित्ताने त्याचे व मृत महिलेची ओळख वाढली. नंतर मृत महिलेकडून पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून त्याने रंभाबाई यांना जीवे मारले, असा त्यांच्या नातेवाइकांचा आरोप आहे.
पालखेड कालव्यात पडून तरुणी बेपत्ता
दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातच निफाड तालुक्यातील पालखेड डाव्या कालव्याच्या परिसरात शनिवारी सायंकाळी कपडे धुण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. कालव्याच्या वेगवान प्रवाहात ती वाहून गेल्याने तिचा शोध सुरू आहे. नैताळे-बोकडदरे शिवारात ही घटना घडली. ज्योती अनिल शेकरे (वय १८, रा. ओबीधोंड, ता. पेठ) असे तरुणीचे नाव आहे.
Mumbai News : मालिकेच्या शूटवरुन येताना अपघात, अभिनेत्याच्या मृत्यूप्रकरणी मुंबईत पाच डॉक्टरांवर गुन्हा, पायावरील शस्त्रक्रिया भोवली
ज्योती कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा पाय घसरल्याने ती पाण्यात पडल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत प्रशासनाला कळवले. सायंकाळपर्यंत तरुणीचा शोध लागला नव्हता.
