• Sun. Jun 7th, 2026
    Ashok Kharat Case : अशोक खरातचे पाय खोलात, नाशिकमध्ये आणखी एका पीडितेकडून तक्रार, फिर्यादीकडून गंभीर आरोप

    भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात आणखी एका पीडित महिलेने पुढे येत तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने अशोक खरात याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात आणखी एका महिलेने आज पुढे येत लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. महिलेच्या या आरोपांची गंभीर दखल घेत पोलिसांनी अशोक खरातच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आज दाखल झालेल्या गुन्ह्यात अशोक खरात याच्याविरोधात अनेक वेगवेगळे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे अशोख खरात याचा पाय आणखी खोलात जाताना दिसत आहे. अशोक खरात याच्या विरोधात तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीकडून खरातची सखोल चौकशी केली जात आहे. अशोक खरातच्या कृत्यांचे थेट सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने त्याचे खरे रुप सर्वांच्या समोर आले आहेत. मोठमोठ्या लोकांसोबत त्याचे उठणे-बसणे असल्यामुळे त्याच्यावर होणाऱ्या आरोपांवर कुणाचा विश्वास बसला नसता. पण थेट व्हिडीओ समोर आल्याने त्याचे खरे रुप बाहेर आले आहे.

    भोंदूगिरी करत महिलांचे शोषण करणाऱ्या नराधम अशोक खरातचा काळा चेहरा आता आणखी गडद झाला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात दुसरा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. अघोरी कृत्य करायचा आणि धमक्या द्यायचा. धक्कादायक बाब म्हणजे, ही पीडित महिला जेव्हा उपचारांसाठी येत असे, तेव्हा खरात तिच्या पतीला बाहेर बसवून आतमध्ये ‘पूजा-विधी’च्या नावाखाली तिचे लैंगिक शोषण करत होता.

    एवढेच नव्हे तर, भाविकांना घाबरवण्यासाठी तो नकली साप आणि वाघाच्या कातडीचा वापर करून अघोरी कृत्य करत असल्याचा उल्लेखही पीडित महिला हिने दिलेल्या तक्रारीत केला आहे. जर या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली, तर पीडिता आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    पोलिसांकडून कडक कारवाई

    या प्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत BNS ६४ (१) (बलात्कार), ७४, ३५१ (२) (धमकावणे) सह ‘महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत’ कडक कलमे लावली आहेत. बाबा, बुवा भोंदूगिरीच्या जोरावर महिलांची फसवणूक करणाऱ्या या नराधमाच्या विरोधात आता आणखी काही तक्रारदार पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा