• Sun. Jun 14th, 2026
    Ashok Kharat Video : पोलिसांनी अशोक खरातला आणलं वठणीवर; म्हणाला, ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, व्हिडीओ समोर

    अशोक खरात याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत तो पोलिसांच्या मदतीने चालताना दिसत आहे. यावेळी तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देताना दिसत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. राज्य सरकारने अशोक खरातच्या प्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटीकडून आज चौथ्या दिवशीही तब्बल सात तास अशोक खरातची चौकशी करण्यात आली आहे. अशोक खरात याच्यावर आज आणखी एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अशोक खरात याच्या विरोधात आज दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. खरात याच्या एसआयटी चौकशीनंतर क्राइम ब्रांचने अशोक खरातचा ताबा घेतला. अशोक खरातला आज क्राइम ब्रांच युनिट एकमध्ये आणण्यात आले. या दरम्यान अशोक खरातचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अशोक खरात हा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं बोलताना दिसत आहे.

    अशोक खरात याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्याची कसून चौकशी सुरु आहे. या दरम्यान त्याला आता पोलिसी खाक्या मिळताना दिसत आहे. त्याचाच परिणाम संबंधित व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत तो पोलिसांसोबत लंगडत चालत आहे. यावेळी तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, अशी घोषणा करतो. तसेच ताकद नाही राहिली, असंही तो बोलताना दिसतोय.

    दरम्यान, अशोक खरातच्या चौकशी दरम्यान कमालीची गुप्तता देखील पाळली जात असल्याचं दिसत आहे. अशोक खरात याची SIT मार्फत गेल्या 4 दिवसांपासून कसून चौकशी केली जात आहे. खरात याच्या महिलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडिओ, त्याची करोडोची मालमत्ता, त्याच्या कार्यालयातील कॉम्प्युटर्स, त्याचे अध्यक्ष असलेल्या खाजगी संस्थान या संपूर्ण प्रकाराची SIT च्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडून आणि अन्य अधिकारी यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. गेल्या ३ दिवसांपासून खरात याची नाशिकच्या पोलीस हेडक्वार्टर येथील हिमांशू पोलीस क्लब येथे तासंतास चौकशी केली गेली आहे. यातच रविवारी देखील खरात याची SIT कडून चौकशी करण्यात आली. मात्र आज SIT कडून खरात याची आज कमालीची गुप्तता बाळगत शहरातील एका अज्ञातस्थळी त्याची कसून चौकशी करण्यात आली.

    एकूणच भोंदू बाबा अशोक खरात याच्या तपासप्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसून येत आहे. एकाच वेळी खरातच्या महिला लैंगिक अत्याचार, अन्य गुन्हे, कोट्यावधींची संपत्ती, व्यवहारांची आणि संस्थानच्या संदर्भातील SIT चौकशी ही केली जात असून, आता या प्रकरणात काय महत्त्वाचे धागे-दोरे पोलिसांच्या हाती लागतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा