नांदेडचे भाजप आमदार राजेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश, शेतीच्या वादातून चुलत भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, आमदार राजेश पवार यांच्याविरुद्ध नायगाव न्यायालयाचा मोठा निर्णय.
पण पोलीसांनी कुठलीही कारवाई न केल्याने श्रीराम पवार यांनी न्यायालयात धाव घेतली. हा प्रकार दाखलपात्र गुन्ह्याचा असल्याने चौकशी करण्याचे आदेश नायगाव न्यायालयाच्या प्रथमर्वग न्याय दांडाधिकाऱ्यांनी दिले. 13 मार्च रोजी न्यायालयाने हे आदेश दिले. या प्रकरणात स्टे मिळण्यासाठी आमदार राजेश पवार यांनी बिलोली अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली. राजेश पवार यांना स्टे मिळाल्याचीही माहिती आहे.
Pune Crime : कबुतर चोरीचा संशय, मध्यरात्री टोळक्याकडून पाठलाग; हातपाय बांधून बेदम मारहाण, 19 वर्षीय रुपेशचा जीव गेला
मेडीकलवर नशेच्या गोळ्यांची विक्री, सापळा कारवाई
नांदेड : नांदेड शहरातील राज कॉर्नर येथील एका औषधी दुकानातून पोलीसांनी नशेच्या 1600 गोळ्या जप्त केल्या. जय हनुमान मेडिकल येथे नशेच्या गोळ्या विक्री केल्या जात असल्याची गोपनीय माहिती भाग्यनगर पोलिसांना मिळाली. पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा लावला. पोलीसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाने नशेच्या दहा गोळ्या मागितल्या. डॉक्टरांनी चिट्टी नसतांना मेडिकल चालकाने त्याला pregabalin capsules या गोळ्या दिल्या.
विषेशता या गोळ्याचा वापर गुन्हेगार नशेसाठी करत असल्याच पोलिसांनी सांगितलं. जय हनुमान मेडिकलवर नशेच्या गोळ्या विक्री होत असल्याची माहिती पोलीसांनी अन्न औषध प्रशासनाला दिली. अन्न औषध प्रशासन आणि पोलीसांनी संयुक्तपने धाड टाकून मेडिकलची तपासणी केली. तेव्हा 1600 गोळ्यांचा साठा पोलिसाना आढळला. या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
