काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक होते. त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशासाठी आपण प्रयत्न केले होते, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना विचारण्यात आलं होतं. सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पक्षप्रवेशाला परवानगी दिली होती. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या केंद्रातील मंत्रिपदाच्या अटीमुळे पक्षप्रवेशाला मान्यता दिली नव्हती, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना याबाबतचा दावा केला आहे.
“मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची मी परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे अट ठेवली. मला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागले. मला केंद्रात मंत्री करा. अन्यथा भाजपचे नागपूरचे दोघे नेते मला परत निवडून येऊ देणार नाहीत. तिथे त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
तत्कालीन पंतप्रधान काय म्हणाले होते?
“मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना न विचारचा सोनिया गांधी यांना गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल विचारलं होतं. मला पंतप्रधानांनी बोलावलं, त्यांनी मला विचारलं की, तू परस्पर त्यांना आश्वासन दिलं का? माझ्या लगेच लक्षात आलं. सोनिया गांधी यांना विचारलं, पण तुम्हाला विचारलं नाही ही मोठी चूकच झाली. भाजपच्या म्हणजे विरोधी पक्षाच्या गटनेत्याला आपल्या पक्षात घेऊन मंत्री करणं हे लाज गेल्यासारखं आहे. मी बिलकूल करणार नाही, असं मनमोहन सिंह म्हणाले, असा दावा चव्हाण यांनी केला.
मनमोहन सिंह आपल्यावर रागावल्याचा चव्हाण यांचा दावा
“मनमोहन सिंह पहिल्यांदा माझ्यावर रागावले. मी डोक्याला हात लावला. म्हटलं, काय मी मोठी चूक केली. यावर मार्गच नाही ना, विचारायला हवं होतं. मंत्रिमंडळ करायचा अधिकार कुणाचा असतो? सोनिया गांधी यांनी मान्यता दिली. पण पंतप्रधान मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेतात. मी काय बोलावं आणि तोंड कुठे लपवावं ते मला कळत नव्हतं. मी आलो आणि शेवटी सांगितलं, सॉरी. हे शक्य होणार नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांचं महाराष्ट्रात भाजप वाढवण्यात मोठं काम
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून ज्या गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे, ते महाराष्ट्रातील भाजपचे एकेकाळचे प्रमुख नेत्यांपैकी एक होते. महाराष्ट्रात भाजप संघटनात्मक दृष्टीकोनातून वाढवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी खूप परिश्रम घेतले होते. भाजप पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप विरोधी बाकावर असताना विरोधी पक्षातील नेते म्हणून आपलं काम चोखपणे पार पाडलं होतं. 2014 मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. त्यावेळी गोपीनाथ मुंडे केंद्रात ग्रामविकास मंत्री झाले होते. पण दुर्दैवाने त्यानंतर 3 जून 2014 रोजी त्यांच अपघाती निधन झालं होतं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा