• Sat. Aug 15th, 2026

Pune Crime : इन्स्टाग्रामच्या कमेंट अन् लाईकवरुन वाद, पुण्यातील नामांकित ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे जोरदार राडा; तरुणींचं धक्कादायक कृत्य

Pune Flying Gypsy Cafe : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील एका नामांकित कॅफेमध्ये रिल्सच्या क्षुल्लक वादातून थेट कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुणे फ्लाईंग जिप्सी कॅफे मारामारी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात आता गुन्हेगारीनं टोक गाठलं आहे. इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावरील रिल्सच्या क्षुल्लक वादातून थेट कोयत्याने सपासप वार केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ज्या ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये हा रक्तरंजित थरार घडला, तोच कॅफे काही दिवसांपूर्वी एका पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनामुळे राज्यभर चर्चेत आला होता. आज पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कॅफेमधील पार्टीत कोयता गँगनं धुमाकूळ घालत पुणे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन परिसरातील प्रसिद्ध ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे 4वाजेपर्यंत तरुणाईची पार्टी रंगात आली होती. याचवेळी सोशल मीडियावरील रिल्सला लाईक आणि कमेंट करण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाली. या किरकोळ शाब्दिक वादाचं रुपांतर काही क्षणातच भयंकर हाणामारीत झालं. संतापाच्या भरात 8 ते 10 जणांच्या एका टोळक्यानं थेट कोयते उपसले आणि एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला.

Maharashtra TimesPune News : 38 व्या वर्षी 11.5 कोटींची संपत्ती, पुण्यातील DINK जोडप्याचा निवृत्तीचा विचार, नेटिझन्सची तोंडात बोटं, नोकरीमुळे तब्येती बिघडल्या
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दहशत माजवत कोयत्याने वार करणाऱ्या या 8 ते 10 जणांच्या गँगमध्ये दोन मुलींचाही प्रत्यक्ष सहभागहोता. पहाटेच्या वेळी अचानक हत्यारबंद टोळक्यानं केलेल्या या हल्ल्यामुळे कॅफेमध्ये एकच हाहाकार उडाला. जीवाच्या भीतीनं उपस्थित तरुण-तरुणींनी सैरावैरा पळ काढल्यामुळे तिथे मोठी घबराट निर्माण झाली होती.

‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफे आधीही वादामुळे चर्चेत

हाच ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफे गेल्या महिन्यात एका मोठ्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी होता. याच कॅफेमध्ये तोडफोड आणि गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांच्यावर २९ जून २०२६ रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, नंतर या संपूर्ण घटनेची सखोल सत्यता पडताळण्यात आली आणि नेमके तथ्य समोर आल्यानंतर PSI कदम यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. या प्रकरणाची धग थंड होते ना होते तोच, आता याच कॅफेमध्ये पहाटेपर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि कोयता गँगचा राडा चव्हाट्यावर आला आहे.

Maharashtra TimesPune News : कोट्यावधी खर्चूनही दुरावस्थाच; ‘एमआयडीसी’ च्या पायाभूत कामांची श्वेतपत्रिका तातडीने प्रसिद्ध करून हिशेब मांडायची मागणी
या घटनेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. शहरात वेळेची मर्यादा असतानाही ‘फ्लाईंग जिप्सी’मध्ये पहाटे ४ वाजेपर्यंत पार्ट्या कशा सुरू असतात? कडेकोट सुरक्षा असतानाही तरुणांच्या हातात थेट कॅफेच्या आत कोयते पोहोचतातच कसे? पुण्यातील उशिरापर्यंत चालणारी ‘कॅफे संस्कृती’ आणि त्यात शिरकाव केलेली गुन्हेगारी यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असले तरी, या घटनेमुळे पुणेकरांमध्ये मोठी संतापाची लाट उसळली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा