• Sat. Aug 15th, 2026

Pune News : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 37 अधिकारी आणि अंमलदारांचा राष्ट्रपती पदकांनी सन्मान

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील तब्बल 37 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह अनेक अधिकारी आणि अंमदलादारांचा समावेश आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलात दीर्घकाळ उल्लेखनीय, निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवापदक, उत्कृष्ट सेवापदक आणि विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह 21 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवापदक व उत्कृष्ट सेवापदक मिळाले आहे. तर 15 पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

राष्ट्रपती पदकाने शिनानंद स्वामी यांचा सन्मान

गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेसाठी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या दीर्घकाळच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हा गौरव करण्यात आला आहे.

अतिउत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सपोआ विठ्ठल कुंबडे, पोलीस निरीक्षक नितीन गिते, अनिल विभुते, अरविंद पवार, गोरखनाथ कुंभार, पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सपोफौ नागेश माळी, राजेंद्र शिंदे, सुनील कानगुडे, राजू जाधव, आदिनाथ मिसाळ आणि पोलिस हवालदार रामदास बारटक्के यांचा समावेश आहे.

उत्कृष्ट सेवापदक

उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सुहास आवाड, रविकिरण नाळे, सचिन शिर्के, सपोनि सचिन घाटे, सपोफौ दिपक महाजन, राजेंद्र कोनेरी, पोलीस हवालदार विवेक जगदाळे, अनिल साळुंखे, अमोल निघोट, संतोष शिंदे, आशिष बोटके, कामिनी पवळे आणि मपोशि नुतन जाधरी यांचा सन्मान करण्यात आला आहे.

विशेष सेवा पदकासाठी 15 जणांची निवड

विशेष सेवा पदकासाठी पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, पोलीस उपनिरीक्षक सागर देवकर, महेश सातपुते, गणेश आठवे, दत्तात्रय सुकाळे, श्रीकांत गुरव, महादेव भालेराव, आबा कटपाळे, प्रकाश पारखे, राहुल दुधमल, लक्ष्मण मोगले, अनिल टाफे, चंद्रशेखर मोरखंडे, राजेंद्र पानसरे आणि चिरंजीव दलालवाड यांची निवड करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने पदक वितरण समारंभ

पदक विजेत्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्तालयातील शिवनेरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या पदक प्रदान समारंभात सन्मा नकरण्यात आला.

हा पदक प्रदान समारंभ पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त गुन्हे सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग डॉ. बसवराज तेली, तसेच सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पदकप्राप्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेत झालेला हा सन्मान पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे. उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याला या पदकांमुळे विशेष अधोरेखित मिळाले असून, पोलीस दलातील इतर कर्मचाऱ्यांनाही यामुळे प्रेरणा मिळणार आहे.