• Sat. Aug 15th, 2026

रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाची दशकपूर्ती; फडणवीस, शिंदे यांच्या कविता, सभागृहात एकच हशा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं नाव घेतलं की त्यांच्या हटके कविता सर्वांना आठवतात. पण यावेळी आठवले स्टाईलमध्ये कविता केली ती मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी आणि तेही आठवले यांच्यासमोर! झालं असं की रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नेत्यांनी आठवलेंच्या राजकीय शैलीचाही खास अंदाजात गौरव केला. विशेषतः शिंदे-फडणवीसांनी आठवले स्टाईलमध्ये केलेल्या कवितेने सभागृहात हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed