तुकाराम मुंढे यांना त्यांचा मित्र जबरदस्ती रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी घेऊन गेला. संबंधित रेस्टॉरंटमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचं तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आलं. मुंढे यांनी रेस्टॉरंटच्या मॅनेजमेंटला याबाबत समज दिली. यानंतर 24 तासांचा वेळ दिला होता, असा किस्सा तुकाराम मुंढे यांनी सांगितला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे अधिकारी आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी सकस अन्न मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, खाणावळ अशा सर्व ठिकाणी अन्न सुरक्षा नियामांचे पालन केले जात आहे ना? याची तपासणी तुकाराम मुंढे यांच्या अधिकाऱ्यांकडून राज्यभरात केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विविध हॉटेल्समध्ये छापा टाकून कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे मंत्रालायचे कॅन्टीन पासून ते मुंबई हायकोर्टाचे कॅन्टीनचीदेखील तुकाराम मुंढे यांच्या विभागाने तपासणी केली. त्यांच्या या कारवाईंबाबतचा एक मजेशीर किस्सा त्यांनी शेअर केला आहे.
तुकाराम मुंढे एका मित्रासोबत रेस्टॉरंटला जेवणासाठी गेले होते. पण दुसऱ्या दिवशी त्याच रेस्टॉरंटवर एफडीएची धाड पडली होती, अशी चर्चा नेहमी होत असते. याचबाबत तुकाराम मुंढे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
“संदर्भ बरोबर आहे. पण त्याबातची चर्चा चुकीची आहे. त्याबाबतचे तथ्य वेगळे आहेत. संबंधित रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधीच आम्ही अशा अनेक कारवाया केल्या होत्या. तसेच या विभागात बदली झाल्यानंतर मी या विभागाची माहिती जाणून घेतली. या विभागाचे नेमके काम काय आणि भूमिका काय आहे, हे जाणून घेतलं. माझ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी काय ते कसे कारवाई करतील या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला. प्रत्येक विभागाचे एक व्हिजन असते. तसे आमच्या विभागाचे व्हिजन आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.
मित्राने बाहेर जेवणासाठी आग्रह केला
“आम्ही सुरुवातीला प्रतिबंधित वस्तूंच्या विरोधात कारवाई सुरु केली. एकदा माझ्या मित्राने मला बाहेर जेवणासाठी बोलावलं. मी सांगितलं की, मी अन्न सुरक्षा आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत असल्याने तिथे जेवायला येणं हे बरोबर वाटणार नाही. कारण मी रेस्टॉरटला गेलो तर मी तिथे आजूबाजूला पाहतो. मला तिथल्या अन्नाची चव घ्यायची नाही. त्यामुळे मी न आलेलो बरा, असं सांगितलं”, असं मुंढे म्हणाले.
“मित्राने आग्रह केला की, संबंधित रेस्टॉरंट खरंच खूप चांगलं आहे. मी सांगितलं की, परत एकदा विचार कर. कारण उद्या काही घडलं तर ते रेस्टॉरंटवाले तुझ्यावर ब्लेम करतील, माझ्यावर नाही. तर ते म्हणाले, नाही तुम्ही या. मी संबंधितांना काळजी घेण्यास सांगेन. त्यामुळे मी म्हटलं की ठिक आहे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
रेस्टॉरटमध्ये प्रवेश करताच नियमांचं उल्लंघन झाल्याचं आलं लक्षात
“मी तिथे कार्यालयीन कामकाजांनंतर रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास गेलो. मी आत शिरताच सर्वप्रथम लक्षात आलं की, रेस्टॉरंटचा परवाना ठळक आणि सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे आवश्यक असतानाही तो तिथे लावलेला नव्हता. पण मी तिथे काही बोललो नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे पाण्याच्या बोटल विकत मिळत होत्या. पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा नव्हती. तुम्ही मागणी केली तर ते पाण्याची बॉटल देत. त्यानंतर आमच्यात गप्पा झाल्या”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
पनीर ऑर्डर न करण्याचा सल्ला दिला
“माझा मित्र पनीर ऑर्डर करत होता. मी त्याला सल्ला दिला की, पनीरची ऑर्डर नको देऊस. कारण खरं पनीर असण्याची शक्यता कमी आहे. त्यावर त्यांनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना हे खरं पनीर आहे ना की अॅनलोग पनीर आहे, याची विचारपूस केली. त्यावर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी हे खरं पनीर असल्याचा दावा केला. मी पुन्हा विचारलं की खरंच ते पनीर आहे? ते हो म्हणाले”, असं मुंढे म्हणाले.
पनीर खरं नव्हतं, मॅनेजमेंटला समजवलं, 24 तास सुधारण्यासाठी दिले
“पनीर जसे टेबलावर आले तेव्हा मी माझ्याकडे घेतलं आणि चेक केलं. मी विचार केल्याप्रमाणे ते खरे पनीर नव्हतेच. खरं पनीर ओळखण्यासाठी काही विशेष क्लृप्ती नाही. ते किती मऊ आहे, अशा काही टेक्निकल गोष्टी आहेत. मी त्यांना सांगितलं की, नका खाऊ. तर मित्राने ते नाही खाललं. त्यावेळी मी संबंधित रेस्टॉरंटच्या मॅनेजमेंटला सांगितलं की, तुम्ही या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्या सुधारुन घ्या. इतकं सांगून मी काहीच केलं नाही. यानंतर 24 तासांनी मी इतरांना तिथे जाऊन नियमांचे पालन केले आहे का? याची चाचपणी करण्यासाठी पाठवले. त्यांना नियमांचे पालन करण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला होता. त्यानंतर आम्ही तपासणी केली”, असा किस्सा तुकाराम मुंढे यांनी सांगितला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा