Weather Update: महाराष्ट्रात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाल्यामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. मंगळवारी दिवसभर वातावरण कोरडं राहील. बुधवारी आणि गुरुवारी मुंबईत हलक्या सरींची शक्यता आहे.
तापमानाचा पारा घसरला
राज्यभरात निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे मुंबईचे कमाल तापमान कमी झाले आहे. मुंबईमध्ये कुलाबा येथे ३२.६ तर सांताक्रूझ येथे ३१.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान १.५ अंशांनी खाली उतरले होते. आर्द्रतेमुळे किमान तापमानाचा पारा मात्र चढा आहे. कुलाबा येथे २५.५ तर सांताक्रूझ येथे २३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे २.८ आणि २.१ अंशांनी अधिक होते.
Maharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाचा ‘यलो अलर्ट’, 17 -20 मार्च मुसळधार पावासाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
कोकण विभागात मंगळवारी कोरडे वातावरण असेल मात्र त्यानंतर अवकाळी पाऊस उपस्थिती लावेल. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना मंगळवारी यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरीला गुरुवारीही यलो ॲलर्ट असून या काळात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांचा वाढलेला वेग स्थानिकांना जाणवू शकेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका पाऊस आणि मेघगर्जनेचा अंदाज आहे.
ST Bus: एसटीच्या ‘ई-बस’ ठरत आहेत तोट्याचं कारण, दरवर्षी बसेल 1,489 कोटींचा फटका; महामंडळाची प्रकल्प रद्द करण्याची मागणी
मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’
गुढीपाडव्यादिवशी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातही यलो ॲलर्ट आहे. विदर्भात अनेक ठिकाणी यलो ॲलर्ट देण्यात आला असून या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव येथे यलो ॲलर्ट आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, कोल्हापूर येथे गुढीपाडव्याला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली येथे बुधवार आणि गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूरात गुरुवारपर्यंत तीनही दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
