• Fri. Aug 28th, 2026

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 28, 2026


पुणे, दि.२८: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विधी/न्यायिक सेवा परीक्षा (JMFC व CJJD) पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) क्र. १११०/२०२५ च्या संदर्भात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर (CJJD) परीक्षेसाठी आवश्यक असलेला वकिलीचा अनुभव (Law Practice) तीन वर्षांवरून एक वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाच्या अनुषंगाने सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विधी/न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी असलेली तीन वर्षांच्या वकिलीच्या अनुभवाची अट बदलून एक वर्ष करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणाच्या अनुषंगाने वर्ष २०२६-२७ करिता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ करिता ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक ९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे.

टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या संस्थांच्या लक्षित गटातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी सुधारित पात्रता निकषाची नोंद घेऊन त्यानुसार ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन निलेश सागर (भा.प्र.से.), अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण अंमलबजावणी व समन्वय समिती तथा आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (आसंप्रसं), पुणे यांनी केले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed