• Mon. Sep 21st, 2026

Mumbai Local: मध्य रेल्वेप्रवाशांना दिलासा! गणपती विसर्जनासाठी 3 दिवस विशेष लोकल फेऱ्या चालवणार, कसे आहे नियोजन? पाहा वेळापत्रक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत घरी परतणाऱ्या मुंबईकरांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २२ विशेष उपनगरीय रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. मुख्य मार्गावर उत्सवातील शेवटच्या तीन दिवशी १८ आणि विसर्जनाच्या दिवशी हार्बर मार्गावर चार फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्यरात्रीनंतरही भाविकांना मुंबईतून ठाणे, कल्याण आणि पनवेलच्या दिशेने परतीचा प्रवास करता येणार आहे.

२३, २४ आणि २५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणेदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर २५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर विशेष लोकल फेऱ्यांची सुविधा देण्यात आली आहे. सर्व विशेष गाड्यांना मार्गातील सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

Western Railway Update: पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! 84 लोकलचा थांबा रद्द, गणपती विसर्जनाची गर्दी विभागण्यासाठी निर्णय, कसे आहे नियोजन?मुख्य मार्ग

२३/२४, २४/२५ आणि २५/२६ सप्टेंबर

विशेष फेरी आणि वेळ

सीएसएमटी-कल्याण – मध्यरात्री १.४० वा.

सीएसएमटी-ठाणे – मध्यरात्री २.३० वा.

सीएसएमटी-कल्याण – मध्यरात्री ३.२५ वा.

कल्याण-सीएसएमटी – मध्यरात्री ००.०५ वा.

ठाणे-सीएसएमटी – मध्यरात्री १.०० वा.

ठाणे-सीएसएमटी – मध्यरात्री २.०० वा.

सहा फेऱ्या प्रत्येकी तीन रात्री धावणार असल्याने मुख्य मार्गावर एकूण १८ विशेष फेऱ्या होतील.

हार्बर मार्ग

केवळ २५/२६ सप्टेंबर

विशेष फेरी आणि वेळ

सीएसएमटी-पनवेल – मध्यरात्री १.३० वा.

सीएसएमटी-पनवेल – मध्यरात्री २.४५ वा.

पनवेल-सीएसएमटी – मध्यरात्री १.०० वा.

पनवेल-सीएसएमटी – मध्यरात्री१.४५ वा.

Maharashtra TimesSahil Wakode : IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात नवीन अपडेट, सात तासानंतर पालकांनी बॉडी घेतली ताब्यात; तपास आता गुन्हे शाखेकडेतर दुसरीकडे, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८वर जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. गुजरात बाजूकडून घोडबंदर, वर्सोवा, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांची वाहतूक २० आणि २५ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन संपेपर्यंत बंद ठेवण्याची अधिसूचना पालघरचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी सुभाष भागडे यांनी प्रसृत केली आहे. शनिवारीही हे निर्बंध लागू होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed