कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी वर्ध्यात विद्यार्थ्यांसाठी विशेष संवाद मेळावा घेतला. या कार्यक्रमात नितेश कराळे मास्तर हे देखील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनातील प्रश्न मोकळेपणाने दिपके आणि कराळे यांच्यासमोर मांडले. तर कराळेंनी दिपकेंसमोर बोलताना तुरुंगातील प्रसंग सांगितला. ज्यामुळे समोर असलेले विद्यार्थीच काय तर अभिजीत दिपकेही खळखळून हसले.