साताऱ्यातील एक नामांकीत शाळेतील केअरटेकरने तब्बल 24 मुलांना मारहाण, धमकी देवून लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात कठोर कारवाई केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : साताऱ्यातील एका नामांकित स्कूलमधील केअरटेकरने तब्बल 24 मुलांना मारहाण, धमकी देऊन त्यांचे लैगिंक शोषण, मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून संबंधित केअरटेकरला अटक केली आहे. साताऱ्यातील या संतापजनक घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्रजी माध्यमाच्या एका नामांकित स्कूलमधील तीन मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्कूल प्रशासनातील अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून संबंधित केअरटेकरवर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आणखी काही मुलांचे लैगिंक शोषण आणि मारहाण करून पैसे उकळल्याचे समोर आले.
यासंदर्भात स्कूल व्यवस्थापनाने देखील काही मुलांशी चौकशी केली. त्यामध्ये एकूण २४ मुलांच्या बाबतीत त्या केअरटेकरने घृणास्पद कृत्य केल्याची बाब स्पष्ट झाली. गेल्या काही वर्षांपासून त्याच्याकडून हा प्रकार सुरू होता, अशी माहिती सातारा शहर पोलिसांनी दिली. स्कूलमध्येच मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने सातारा शहरात मोठी खळबळ उडाली.
या घृणास्पद प्रकाराबद्दल काही मुलांनी आपल्या पालकांना तसेच शाळेतील शिक्षकांना सांगितल्यामुळे ही घटना उघडकीस आली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. साताऱ्यातील नामांकित स्कूलमध्ये अशी घटना घडल्याने एकूणच पालक वर्गाची चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस अशा घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शाळांच्या व्यवस्थापनाला आता कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
स्कूल प्रशासनातील अधिकाऱ्याने सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित केअरटेकरने तीन शाळकरी मुलांचे चार ते पाचवेळा लैंगिक शोषण केले. या प्रकारामुळे मुले भयभीत झाली. घडलेल्या प्रकाराची मुलांनी वाच्यता करू नये म्हणून केअरटेकरने त्यांना मारहाण करून धमकीही दिली. मुलांना मारहाण करून हात पिरगळा तसेच डोके आपटले. हा प्रकार २५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी तसेच ७ मार्च २०२६ या कालावधीत घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे (पोक्सो) गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर झाला असल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा