दारूच्या नशेत धुंद असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने एसटी बसच्या चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “मी पोलीस आहे, ॲट्रॉसिटी दाखल करेन” अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
“मी पोलीस आहे, ॲट्रॉसिटी दाखल करेन”
दि. १ मार्च २०२६ रोजी सायं. ५.२५ वाजता उदगीर आगाराची (जि. लातूर) एमएच २४ ए क्यू ७९७० क्रमांकाची बस राहाता बसस्थानकात आली असता हा प्रकार घडला. फिर्यादी वाहक बालाजी पंडितराव बोरगावकर (वय ४४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, येवला शहर (जि. नाशिक) येथे नेमणूक असलेले पोलीस कॉन्स्टेबल क्र. ३६१ फकीरा तोताराम थोरात यांनी दारूच्या नशेत बसमध्ये धिंगाणा घालत चालक विकास बालाजी मुंडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.इतक्यावरच न थांबता आरोपीने आपल्या इतर साथीदारांना बोलावून चालकावर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. धक्काबुक्की करत चालकाचा गणवेश फाडण्यात आला. शिवीगाळ व दमदाटी करत, “मी पोलीस आहे, तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करेन, पोलिसांना कामाला लावून टाकेन,” अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे काही काळ बसस्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
Alibaug News: ‘सकाळी बोटीवर येतो’, धुळवडीच्या रंगात विरजण; कोळीवाड्यात मच्छिमाराचा मृत्यू, सलग दुसऱ्या वर्षी सणानंतर पुनरावृत्ती
शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल
या प्रकरणी राहाता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ६४/२०२६ अन्वये बीएनएस कलम १३२, १२१(१), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत फकीरा थोरात, सार्थक बनसोडे (रा. साकुरी) व अन्य दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो. स. ई. कोमल कुमावत करीत आहेत.
Crime News : स्वयंपाकावरुन सासूशी वाद, 35 वर्षीय इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं, चार वर्षांचं लेकरु मातृत्वाला मुकलं
पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह
कायद्याचे रक्षण करणाऱ्यांकडूनच कायद्याचा भंग होत असेल, तर सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या या घटनेवर वरिष्ठांकडून काय कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
