महाराष्ट्र राज्य लोकायुक्तांनी कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट या प्रकरणात धनंजय मुंडे यांना दिलासा दिला.हा षडयंत्राचा काळ आहे, माझं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न चालू होता असं धनंजय मुंडे म्हणाले.अंजली दमानिया यांनी केलेला एकतरी आरोप खरा ठरलाय का? असा सवाल मुंडेंनी केला.आरोप करून खोटे पुरावे द्यायचे असं षडयंत्र होतं असं धनंजय मुंडे म्हणाले.