म. टा. प्रतिनिधी, पुणे: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत दिल्याचा गाजावाजा राज्य सरकारकडून केला जात असतानाच, एसटी महामंडळाच्या सलग भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. जानेवारी २०२५ नंतर आता पुन्हा भाडेवाढ लागू करण्यात आली असून, अवघ्या दीड वर्षांत एसटीच्या भाडेदरांत दोनदा वाढ झाली आहे.
ग्रामीण भागांत शेतकरी, विद्यार्थी, कामगार, मजूर आणि छोटे व्यावसायिक दैनंदिन प्रवासासाठी प्रामुख्याने एसटीवर अवलंबून आहेत. सलग होणाऱ्या भाडेवाढीमुळे राज्यातील या प्रवाशांच्या बजेटवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्रवास सवलतींचे स्वागत होत असले, तरी या योजनांचा आर्थिक भार अन्य प्रवाशांवर टाकला जात असल्याची भावना काही प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
एसटी महामंडळाने जानेवारी २०२५ मध्ये प्रवासी भाड्यात १४.९४ टक्के वाढ केली होती. त्यानंतर १७ जुलैपासून पुन्हा १३.५६ टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली. दोन्ही वाढींचा विचार करता, दीड वर्षांत भाडेवाढीचे प्रमाण २८.५० टक्के होते.
भाडेवाढ हाच पर्याय का?
देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात वाढ झाल्याचे कारण एसटी महामंडळाकडून दिले जाते. मात्र, महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी प्रत्येक वेळी भाडेवाढ करणे योग्य आहे का, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. व्यवस्थापनातील त्रुटी दूर करणे आणि उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त होत आहे. एसटी सेवा आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्याबरोबरच तिचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा असावा, यासाठी राज्य सरकार आणि महामंडळाने संतुलित धोरण आखावे, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
एसटीच्या भाडेवाढीचा परिणाम केवळ महामंडळाच्या प्रवाशांपुरता मर्यादित राहण्याची शक्यता कमी आहे. एसटीचे भाडे वाढल्यानंतर खासगी बस आणि इतर प्रवासी वाहनांकडूनही दरवाढ केली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तसे झाल्यास नियमित प्रवाशांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे या दरवाढीचा विचार करण्याची मागणी होत आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा