• Fri. Mar 13th, 2026
    Government Hostel GR : शासकीय वसतिगृहांच्या नावातून ‘मागासवर्गीय’ शब्द वगळला; महापुरुषांची नावे मिळणार, सामाजिक न्याय विभागाचा ऐतिहासिक निर्णय

    मुंबई: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांच्या नावातील ‘मागासवर्गीय’ हा शब्द आता वगळण्यात आला आहे. यापुढे ही वसतिगृहे महापुरुषांच्या नावाने ओळखली जातील. सामाजिक विषमता दूर करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान जागृत करणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असून याबाबतचा शासन निर्णय (GR) नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.

    शासकीय निर्णयानुसार, राज्यातील एकूण ४४९ वसतिगृहांपैकी ४१६ वसतिगृहांच्या नावांमध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार आता मुलांच्या वसतिगृहांना ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह ‘ तर मुलींच्या वसतिगृहांना ‘ सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह’ ही नावे असणार आहेत.

    केवळ विद्यमान वसतिगृहेच नव्हे, तर यापुढे सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या सर्व मुला-मुलींच्या वसतिगृहांना देखील हीच नावे दिली जाणार आहेत.

    Satara News : लगीनघर दु:खाने वेढलं, भावाच्या लग्नासाठी जवानाने सातारा गाठलं, पण सुट्टी शेवटची ठरली

    ‘मागासवर्गीय’ शब्द वगळण्यामागची भूमिका

    सध्या अनेक वसतिगृहांच्या नावांमध्ये ‘मागासवर्गीय’ या शब्दाचा वापर केला जात होता. प्रशासनाच्या मते, हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करतो, ज्यामुळे नकळतपणे विषमता अधोरेखित होते. अशा नामकरणामुळे संस्थेची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते आणि विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही प्रभावित होतो. ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सर्वसमावेशकता जपण्यासाठी ‘मागासवर्गीय’ हा शब्द काढून त्याऐवजी महापुरुषांची प्रेरणादायी नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    राज्यातील वसतिगृहांची स्थिती आणि सुविधा

    राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे चालवली जातात. यामध्ये २३१ मुलांची आणि २१८ मुलींची वसतिगृहे आहेत. यामधील एकूण प्रवेश क्षमता: ४६,६७३ विद्यार्थी एवढी आहे.

    Maharashtra TimesChhagan Bhujbal : ‘अजितदादांचं विमान झाडावर आदळल्याचं आश्चर्य वाटलं’; तपासातील झाडाच्या थेअरीवर छगन भुजबळांना शंका

    मुलांची क्षमता: २४,९५८.

    मुलींची क्षमता: २१,७१५.

    या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ निवास व्यवस्थाच नाही, तर मोफत नाश्ता, दोन वेळचे जेवण, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश यांसारख्या सुविधा पुरविल्या जातात. याशिवाय आधुनिक सुविधा म्हणून टीव्ही, वॉटर कुलर, ॲक्वागार्ड आणि सुरक्षिततेसाठी फायर फायटिंग सिस्टमचीही सोय करण्यात आली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed