Nashik Rain Update: गोदावरीचा पूर ओसरत असून, वाहून आलेल्या पाणवेली मंदिरांना अडकल्या आहेत. यामुळे मंदिरांचे विद्रूपीकरण झाले आहे. गोदाघाटावर सुरू असलेली कामे या पुरात वाहून गेली असून, त्यांच्या उघड्या गजांमुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत पावसाचा फारसा जोर नव्हता. परंतु, रविवारी सायंकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये ११.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. सकाळपासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत ३७.६ मिमी पाऊस झाला. दुपारी तीननंतर पावसाचा जोर वाढला. दुपारी ३ ते ६ या वेळेत गंगापूर परिसरात ४० मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये १७ मिमी, अंबोलीत ४१ मिमी पाऊस झाला आहे.
PM Narendra Modi : महाराष्ट्र मागे नाही, पंतप्रधान मोदींकडून नाशिकमधील उपक्रमाची दखल, ‘मन की बात’मध्ये केला उल्लेख
एकाचा मृत्यू ; दोघे जखमी
बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील समाधान सहादू पगार यांना शेतीपंप सुरू करताना विजेचा शॉक लागला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात प्रत्येकी एक व्यक्ती जखमी झाली. जिल्ह्यात एकूण ३२ घरांची पडझड झाली असून, इगतपुरीत नऊ, निफाडमध्ये सहा, सुरगाण्यात पाच आणि कळवणमध्ये चार घरांचे नुकसान झाले
Nashik MHADA Scam: नाशिक महापालिकेचा दणका! म्हाडा घोटाळ्यातील 42 लेआउट रद्द, सामान्यांची घरेही कचाट्यात, प्रकरण काय?
धरणांमधून विसर्ग (क्युसेकमध्ये)
गंगापूर – ४,९४७
कडवा – ६,२१६
भावली – ९४८
पालखेड – ४,९५६
पुणेगाव – १,५६८
ओझरखेड – १,६०२
दारणा – १३,२५०
गौतमी गोदावरी – ५००
काश्यपी – १,०००
वालदेवी – १,३०५
नांदूरमध्यमेश्वर – ४६,२२७
वालदेवी -१,३०५
भाम – २,२४८
भोजापूर – ५४०
आळंदी – १,२६२
मध्यरात्री पुन्हा भूकंपाचे धक्के
नाशिक : नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २५) मध्यरात्रीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शनिवारी दिवसभर सुरगाणा तालुक्यात चार धक्के जाणवल्यानंतर रात्री कळवण तालुक्यातील दळवट परिसर तसेच सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, सराड, चिखली परिसरात पुन्हा धक्के जाणवले. या सर्व ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
