Marathi News Live: भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असल्याने धरणाचे पाच वक्रदरवाजे रविवारी रात्री ८ वाजता उघडण्यात आले. या माध्यमातून भातसा नदीपात्रात १,९९१.३५ क्युसेक (५६.३७५ घनमीटर प्रति सेकंद) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भातसा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारी काहीसा कमी झाला. शहर आणि उपनगरांत दिवसभर अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. मात्र, आज, सोमवारी मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
