Akola Crime News : अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या मृत्यू प्रकरणाने अकोल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यात थेट पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावरच हत्येच्या कटाचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांचा गंभीर आरोप
अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील पक्षांतर्गत वाद आणि जुन्या राजकीय वैमनस्यातूनच माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी जाणीवपूर्वक एक वाहन अंगावर घालून घातपात घडवून आणल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. मोहसीन यांच्या मृत्यूची बातमी पसरताच त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते आणि मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं खदान पोलीस ठाण्यावर धडक दिली. संशयित आरोपी मंगेश काळे आणि त्यांच्या साथीदारांवर तात्काळ हत्येचा कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे अकोल्यात रात्री उशिरापर्यंत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
Akola Crime : भाड्याने राहणाऱ्या पोलिसाकडून घरमालकाच्या मुलीला लग्नाचं आमिष, वारंवार नको ते केलं, अल्पवयीन मुलीचा मृत्यू; चॅटवरुन प्रकरणाचा उलगडा
सुरुवातीला हा निव्वळ अपघात वाटत असला, तरी मृत शेख मोहसीन यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी हा अपघात नसून शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी रचलेला हत्येचा सुनियोजित कट असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
नेमकं काय घडलं?
23 जुलै गुरुवार रोजी संध्याकाळच्या सुमारास अकोल्यातील नेहरू पार्क परिसरात शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन हे आपल्या दुचाकीने जात होते, त्यांच्या गाडीला मागून जोरदार धडक लागल्यानं अपघात घडला आणि अपघातानंतर त्यांना तातडीनं अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. पुढील कारवाई घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू केला असून हा घातपात आहे की अपघात? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
Uddhav Thackeray : ‘जेन झी’ आंदोलन ते केंद्र सरकावर जोरदार घणाघात, उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखत; ‘त्या’ तरुणीची आठवण करुन दिली
सीसीटीव्ही फुटेज जप्त
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केलाय. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. हा अपघात होता की पूर्वनियोजित घातपात, याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे. सध्या या प्रकरणातील आरोप हे कुटुंबीयांकडून करण्यात आलेले असून त्याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे तपासाच्या निष्कर्षाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे सध्या अकोला जिल्ह्यात तणावाचं वातावरण आहे.
