• Mon. Jul 27th, 2026

    अरबी समुद्रावर नैऋत्य मान्सून सक्रिय, महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा; या आठवड्यात कसं असेल हवामान?

    अरबी समुद्रावर नैऋत्य मान्सून सक्रिय, महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा; या आठवड्यात कसं असेल हवामान?

    Weather Update: अरबी समुद्रावर नैऋत्य मान्सून सक्रिय असल्यामुळे इतर हवामान प्रणालींमुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून २७ जुलै रोजी राज्यातील इतर भागातील हवामान अंदाज पाहा.

    म.टा विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी जुलैच्या शेवटी महाराष्ट्रात पावसासाठी कोणतीही सक्रिय प्रणाली नसल्यास पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, मोसमी पावसाचे वारे सक्रिय राहिल्यामुळे येत्या आठवडाभरात महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारी काहीसा कमी झाला. शहर आणि उपनगरांत दिवसभर अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. मात्र, आज, सोमवारी मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज, सोमवारी मुंबईत काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. अरबी समुद्रावर नैऋत्य मान्सून सक्रिय आहे. तसेच, ईशान्य आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रातही मान्सूनची तीव्रता कायम आहे. राजस्थानावरील कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित पूर्व-पश्चिम ‘शिअर झोन’ अरबी समुद्रापर्यंत विस्तारला आहे. या हवामान प्रणालींमुळे संपूर्ण कोकण पट्ट्यात मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले असून, किनारपट्टीवरील काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.

    Maharashtra TimesNashik Rain: धुव्वाधारेनं नाशिक जलमय! 37.6 मिमी पाऊस; जिल्ह्यात दोघे जखमी, 32 घरांची पडझड, 429 नागरिकांचे स्थलांतर

    संपूर्ण आठवडा हवामान कसं असेल?

    ही प्रणाली पुढील काही दिवस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे २८ जुलै ते ३० जुलै या कालावधीत मुंबई, ठाण्यात यलो अलर्ट राहील आणि पुण्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर रायगडमध्ये यलो अलर्ट कायम राहील. परंतु, ३१ जुलै- १ ऑगस्टपर्यंत ही हवामान प्रणाली कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. येत्या काही दिवसांत सर्वत्र वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस दिसून येईल.

    महाराष्ट्रात २६ जुलैनंतर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. २७ जुलै ते ३१ जुलैपर्यंत या मुसळधार सरी कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २७-३१ जुलैदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २८ ते ३० जुलैदरम्यान ताशी ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

    पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात कसा पाऊस असेल?

    पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात सोमवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहील. घाटमाथ्यावर दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे.

    Maharashtra TimesWeather Forecast: आनंदाची बातमी! पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, मराठवाड्यातील बळीराजाची चिंता दूर होणार

    मराठवाडा आणि विदर्भात काय स्थिती ?

    मराठवाड्यात २९ जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान विभागाने नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा